चित्रपट सृष्टीतील IFFSA Toronto महोत्सवाकडे साऱ्यांचेच डोळे लागलेले असतात. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा 'Cue Kya Tha' या लघुपटाची निवड झाली आहे. मेघ पाटीलचे लिखित आणि दिग्दर्शिन असलेल्या 'Cue Kya Tha' या लघुपटात नाशिकहून मुंबईत ॲक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे. कॅनडामध्ये 12 ते 22 दरम्यान हा सिनेमा दाखवला जाणार आहे.(Latest Marathi News)
Cue kya tha हा लघुपट बापटजींच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या अनिल देशपांडे या तरुणाच्या भोवती फिरतो. शौनक अय्यर याने अनिल शर्मा या तरुणाची भूमिका साकारली आहे. या लघुपटात अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी बापटजींची भूमिका उत्तम साकारली आहे. या लघुपटात मुझम्मिल कुरेशी, सोनल सागोरे, मिनिम डे, प्रेरक मेहता, कुणाल शर्मा, सुतोपा सरकार, आकाश जैन यांनी सहाय्यक भूमिकेचे काम पार पाडले आहे.
या लघुपटाची निर्मिती मेघ पाटील आणि हसन नुलवाला यांनी केली आहे. छायाचित्रण ईशान घोष यांनी केलेय. तर शरद जोशी यांचे धमाल संगीत लाभलेल्या या लघुपटासाठी शरीन देवस्थळी यांनी वेशभूषा साकारल्या आहेत. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी डीओपी ईशान घोष यांनी पार पाडली आहे.
दक्षिण आशियाई चित्रपटांसाठी IFFSA Toronto हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय महोत्सव मानला जातो. गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी कॅनडामध्ये IFFSA Toronto फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. आशियाई संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वैविध्यपूर्ण अशा सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड या महोत्सवात केली जाते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.