Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister: बिहारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणआर आहे. सम्राट चौधरी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे १२ आणि जेडीयूचे ११ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
Samrat Choudhary takes oath as Bihar Chief Minister saam tv
Published On

Summary -

  • बिहारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार

  • भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी

  • गांधी मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार

  • अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

बिहारला पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे. बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच शपधविधी सोहळा लवकरच होणार आहे. त्याच दिवशी बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री देखील शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये भाजपच्या विजयानंतर पीएम मोदी, अमित शहा आणि नितिन नवीन हे बिहारला येणार आहेत.

बिहार मंत्रिमंडळ विस्तार सोहळा गांधी मैदानात पार पडणार आहे. भाजपचे १२ आणि जेडीयूचे ११ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, गृहमंत्री अमित शाह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

महत्वाचे म्हणजे, या शपथविधी सोहळ्यादरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार हे देखील मंचावर उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सय्यद अता हसनैन सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राज्याध्यक्ष संजय सरावगी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भिखू भाई दलसानिया आणि माजी मंत्री नितीश मिश्रा हे देखील उपस्थित होते.

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
Crime: मैत्रिणीसोबत जाणाऱ्या मुलीचं अपहरण, शेतात ओढत नेऊन सामूहिक बलात्कार

बिहार विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येनुसार मुख्यमंत्र्यांसह ३६ सदस्यांचे मंत्रिमंडळ असू शकते. सध्या, मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह जेडीयूचे दोन उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांचा समावेश आहे. ३३ आमदारांना मंत्री होण्याची संधी दिली जाऊ शकते. गुरुवारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांची कमाल संख्या ३० पर्यंत पोहोचू शकते.

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
Bihar Politics: मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? बिहारमध्ये भाजपने खेळला मोठा डाव

संभाव्य मंत्र्यांची नावे -

भाजपकडून विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, दिलीप कुमार जैस्वाल, राम कृपाल यादव, संजय सिंह टायगर, श्रेयसी सिंह, अरुण शंकर प्रसाद, लखेंद्र पासवान, रामा निषाद, प्रमोद कुमार चंद्रवंशी आणि सुरेंद्र मेहता यांना संधी दिली जाऊ शकते. नितीन नवीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यामुळे भाजप मंत्रिमंडळात दोन नवीन चेहऱ्यांचाही समावेश केला जाऊ शकतो.

जेडीयूमधून श्रावण कुमार, अशोक चौधरी, लेशी सिंग, मदन साहनी, सुनील कुमार, जामा खान, रत्नेश सदा आणि जयंत राज यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तसंच, मंजरिक मृणाल, अतिरेक कुमार आणि रुहेल रंजन यांच्या नावांची देखील चर्चा सुरू आहे. शीला कुमारी यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
Bihar Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? 'सम्राट' सरकारमध्ये किती असणार मंत्री?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com