१०वीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली, पाहा तुमचा निकाल एका क्लिकवर

Bihar Board 10th Result 2026 Direct Link To check: बिहार बोर्डाचा इयत्ता १०वीचा निकाल २०२६ जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आता अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल सहज तपासता येणार आहे.
Students celebrate as Bihar Board Class 10 Results 2026 are announced, marking another year of academic achievement
Students celebrate as Bihar Board Class 10 Results 2026 are announced, marking another year of academic achievementSaam Tv
Published On

बिहार राज्यातील इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला असून 2026 या वर्षीचे परिणाम समोर आले आहेत. रविवारी 29 मार्चला शिक्षणमंत्री सुनील कुमार यांनी बोर्डचे अध्यक्ष आनंद किशोर याच्या उपस्थितीत या वर्षीचा निकाल घोषित केला आहे. या वर्षी 81.79 विद्यार्थी पास झाले असून मागच्या वर्षीच्या तुलनेने कमी आहे. सलग आठव्या वर्षी बिहार बोर्डाने देशात सर्वप्रथम बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करून इतिहास रचला आहे.

Students celebrate as Bihar Board Class 10 Results 2026 are announced, marking another year of academic achievement
Congress VS BJP Election Result: काँग्रेसच्या दारुण पराभवाची ५ मोठी कारणं; भाजपच्या विजयाचा काय ठरला टर्निंग पॉइंट?

दोन विद्यार्थिनी परीक्षेत अव्वल

या वर्षीच्या गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थिनींनी संपूर्ण राज्यात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये जमुई येथील सिमुलतला निवासी शाळेची पुष्पांजली आणि वैशाली जिल्ह्यातील छौदाही येथील उच्च माध्यमिक शाळेची समीर परवीन यांचा समावेश आहे. दोघींनाही ५०० पैकी ४९२ गुण म्हणजेच ९८.४२% मिळाले आहेत. एकूणच या वेळी पहिल्या १० जणांच्या यादीत १३९ उमेदवारांचा समावेश असून, त्यात मुलींचे वर्चस्व आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६,०१,३९० मुले, तर ६,३४,३५३ मुली होत्या.

Students celebrate as Bihar Board Class 10 Results 2026 are announced, marking another year of academic achievement
Pakistan : पाकिस्तनाच्या निवृत्त लष्करप्रमुखांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बोर्डतर्फे गुणवंतांना रोख बक्षिसे, लॅपटॉप, शिष्यवृत्ती आणि किंडल ई-बुक रीडर देऊन गौरवले जाईल. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ₹२ लाख, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्याला ₹१.५ लाख आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्याला ₹१ लाखाचे रोख बक्षीस मिळेल.


निकाल येथे तपासा

results.biharboardonline.com

biharboardonline.bihar.gov.in

bsebexam.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com