Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

Crime News: अमेरिकेतील एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेला अटक करण्यात आलीय. विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याबद्दल शिक्षिकेला अटक करण्यात आलीय. शिक्षिका विद्यार्थ्यांशी अश्लील चॅटिंग करायची आणि त्यांना बाथरुममधील फोटो पाठवायची.
Crime News:
US middle school teacher Carissa Jane Smith arrested for misconduct involving students.saam tv
Published On
Summary
  • महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन प्रकरणात अटक

  • विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केली अटक

  • आधी विद्यार्थ्यांशी चॅटिंग करत त्यांना बाथरुममधील फोटो पाठवत असायची.

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षक एक समाज घडवत असतात. विद्यार्थ्यांना वाईट-चांगल्या गोष्टीची समज देत असतात. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यासोबतच जीवनातील शहाणपण देत असतात. पण शिक्षकांचे कर्तव्य विसरून एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांचं लैगिक शोषण केल्याची घटना घडलीय. विद्यार्थ्यांना घरी बोलवून त्यांच्यावर अत्याचार करायची.

Crime News:
Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

ही घटना अमेरिकेतील आहे. शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये स्वतःचे फोटो पाठवत असायची. त्यानंतर शाळा सुटल्यानंतर ती विद्यार्थ्यांना घरी बोलवायची. घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करायची. मिररच्या वृत्तानुसार, ३० वर्षीय शिक्षिकेवर विद्यार्थ्यांशी संबंध ठेवण्याचा आणि त्यांना रोख किंवा कॅशअॅपद्वारे पैसे देण्याचा आरोप करण्यात आलाय. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना गांजा, दारू सुद्धा देत असायची.

Crime News:
Crime: लग्नाला नकार दिला, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडला संपवलं; प्रेमाचा भंयकर शेवट

कॅरिसा जेन स्मिथ असं या शिक्षिकेचं नाव असून ती विवाहित आहे. कॅरिसा तिच्याच विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य करत असायची. शिक्षिका विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करायचीच, तसेच त्यांच्याशी अश्लील गप्पाही मारायची. विद्यार्थ्यांना बाथरूममधील ती आंघोळ करतानाचे फोटोही पाठवत असायची. गेल्या नोव्हेंबरमध्ये या शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. तिच्यावर १९ आरोप लावण्यात आले होते.

Crime News:
Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

यात लैंगिक शोषण आणि मुलांचे ड्रग्ज देणे आणि लैंगिक शोषणासाठी मुलांची तस्करी यांचा समावेश होता. तिने तिच्या खटल्यादरम्यान गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान, पीडित विद्यार्थ्यांनी अनेक धक्कादायक आरोप केले. एका विद्यार्थ्याने आरोप केला की तो ऑगस्ट २०२३ मध्ये स्मिथला भेटू लागला, जेव्हा तो माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता. स्मिथ त्याचा वर्गशिक्षिक होती.

यानंतर ती सोशल मीडिया अॅप्सवर त्याच्याशी अश्लील गप्पा करायची. तसेच बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे तिचे फोटोही पाठवत असायची. एका विद्यार्थ्याने सांगितले की शिक्षिकीने त्याला घरी बोलावले नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com