Bypoll Result : भाजपच्या बालेकिल्ल्यात भूकंप! प्रशांत किशोर यांची विजयाकडे वाटचाल; दिग्गज नेत्याला धक्का

Prashant Kishor leading Bankipur bypoll results : बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवारावर मोठी आघाडी घेतली आहे. भाजपच्या तीन दशकांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या उलटफेरीमुळे बिहारच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
Prashant Kishor during the Bankipur by-election campaign in Bihar.
Prashant Kishor takes the lead in Bankipur bypoll.साम टीव्ही मराठी
Published On

Bihar Bypoll Results, Bankipur Assembly Constituency : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. मागील ३० वर्षांपासून या जागेवर भाजपची निर्वादित सत्ता होती. पण या वर्चस्वाला प्रशांत किशोर यांनी सुरूंग लावलाय. जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच थेट निवडणूक रिंगणात उतरत भाजपच्या या बालेकिल्ल्याला मोठे आव्हान दिले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्याविरोधात आघाडी घेत मोठा उलटफेर केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. या जागेवर मागील ६ विधानसभा निवडणुकींपासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी थेट या सुरक्षित नसलेल्या मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. प्रशांत किशोर यांनी भाजप आणि आरजेडी (RJD) दोन्ही पक्षांना बॅकफूटवर ढकलल्याचे दिसत आहे. या निकालामुळे बिहारच्या राजकीय चित्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prashant Kishor during the Bankipur by-election campaign in Bihar.
Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

२९,७५२ मतांसह प्रशांत किशोर आघाडीवर

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत १६ व्या फेरीअखेर (Round 15) 'जन सुराज' पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आपली आघाडी अधिक मजबूत केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रशांत किशोर यांना आतापर्यंत ३१,७४२ मते मिळाली आहेत. त्यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांच्यावर ८,९६६ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपचे नीरज कुमार यांना २२,७७६ मते तर राजद (RJD) उमेदवार रेखा कुमारी यांना ७,५०० मते मिळाली आहेत. आतापर्यंत एकूणात ३१ पैकी १६ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, अजून १५ फेऱ्यांची मोजणी बाकी आहे.

Prashant Kishor during the Bankipur by-election campaign in Bihar.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना बड्या नेत्याकडून थेट ऑफर, राज्याच्या राजकारणात खळबळ

बांकीपूरच्या निकालावर काय म्हणाल्या JDU आमदार शालिनी मिश्रा?

बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी घेतलेल्या आघाडीवर जनता दल युनायटेडच्या (JDU) आमदार शालिनी मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शालिनी मिश्रा म्हणाल्या, “अजून फक्त १६ फेऱ्यांचीच मतमोजणी झाली आहे, अजून १५ फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे पुढे काहीही होऊ शकते. केवळ स्वतःची एक जागा जिंकणे आणि बाकीच्या सर्व जागांवर दारुण पराभव होणे म्हणजे खरा नेता नव्हे. विधानसभेत जन सुराजचे किती उमेदवार उभे होते? ते सगळे वाईट रीतीने पराभूत झाले. त्यामुळे एकट्याने जिंकणे म्हणजे नेतृत्वाची क्षमता मानली जाऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com