राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना बड्या नेत्याकडून थेट ऑफर, राज्याच्या राजकारणात खळबळ

Pankaja Munde offered Chief Minister post : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिटचे संकेत दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Pankaja Munde reacts as Congress invites her to become Maharashtra's first woman Chief Minister.
Congress offers Pankaja Munde a major political role.Saam TV marathi AI
Published On

Pankaja Munde offered Chief Minister post by Congress, Vijay Wadettiwar : मंत्री आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याबाबतचं मोठं विधान केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंनी भाजपची साथ सोडून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं, असं आवाहन विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंना केलं आहे. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेसने थेट ऑफर देत या राजकीय चर्चेला आणखी बळ दिलेय. पंकजा मुंडे या काय निर्णय घेतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेय.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. पक्षात न्याय मिळत नाही असे वाटू लागल्यावर अशा भावना उफाळून येणे स्वाभाविक आहे. आमची पंकजा मुंडे यांना विनंती राहील की, त्यांनी भाजपमधून बाहेर पडून बिनधास्तपणे नेतृत्व करावे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण साथ देऊ. त्यांनी भाजपमधून बाहेर पडून मैदानात उतरावे, आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये घेऊ. त्या काँग्रेसमध्ये आल्यास वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून नक्कीच योग्य निर्णय घेतला जाईल.

Pankaja Munde reacts as Congress invites her to become Maharashtra's first woman Chief Minister.
'रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; काही तासांच्या फरकाने मुंडे भावंडांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

देवेंद्र फडणवीस एक दिवस पंतप्रधान होतील, बाळासाहेब फडणवीसांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, नातेवाईकाला किंवा भावाला असे वाटणे स्वाभाविक आहे. पण शेवटी निर्णय घेणारे गुजरातचे दोघेच आहेत. आमची सत्ता आली तर आमचे नेते ठरवतील आणि त्यांची सत्ता आली तर ते ठरवतील. पंतप्रधान मोदींना हटवून महाराष्ट्रातील कोणताही मराठी माणूस पंतप्रधान झाला, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधानपदी बसला, तर तो आनंदाचाच क्षण असेल.

Pankaja Munde reacts as Congress invites her to become Maharashtra's first woman Chief Minister.
Parking Rules : सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभी करायची? पाहा काय सांगतो नियम

Parking Rules : सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभी करायची? पाहा काय सांगतो नियमअतुल लिमयेंच्या वक्तव्याचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या तरुणाला देशद्रोही म्हणत असेल तर आरएसएसही देशद्रोही आहे. त्यांना कुठून फंडिंग होते हे आरएसएसने उघड करावे. नोंदणी करत नाही. जनतेला हिशोब देत नाहीत. इंग्रजाच्या मागे धावणाऱ्यांनी देशातील तरुणाला देशद्रोही म्हणत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com