'रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; काही तासांच्या फरकाने मुंडे भावंडांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Dhananjay Munde, Pankaja Munde : धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी काही तासांच्या अंतराने केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी राजकारणातून 'एक्झिट' किंवा निवृत्तीचे संकेत देत सध्याच्या राजकीय वातावरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
Dhananjay Munde retirement statement
Dhananjay Munde retirement statement साम टीव्ही मराठी
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Dhananjay Munde retirement statement : बीडच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंडे भावंडांनी राजकीय निवृत्तीबाबत धक्कादायक संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघांनीही एकाच वेळी राजकारणाबाबत नाराजी व्यक्त करत थेट 'एक्झिट' घेण्याची भाषा केली. त्यामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

"सध्याचे जातीपातीचे गलिच्छ राजकारण पाहून यातून बाहेर पडावेसे वाटते," अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली, तर दुसरीकडे "माझ्या विचारांशी राजकारण जुळले नाही, तर समृद्धी महामार्गासारखा राजकारणातून माझाही एक्झिट असेल," असे रोखठोक विधान पंकजा मुंडे यांनी केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात दोन्ही भावंडांकडून एकापाठोपाठ एक अशी विधाने आल्याने, बीडमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Dhananjay Munde retirement statement
Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी माजलगाव येथे एक मोठे विधान केले आहे. "सध्याचे राजकारण हे जातीपाती आणि धर्माच्या आधारावर सुरू आहे. अशा गलिच्छ राजकारणात माझ्यासारख्या माणसाने राहावे की नाही, असा प्रश्न मला पडतो," असे रोखठोक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, "आज समाजात जातीपातीचे वाद निर्माण केले जात असले, तरी आपल्याकडे महापुरुषांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचे स्वराज्य स्थापन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला महान संविधान दिले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, शाहिरी आणि विचार हेच सांगतात की, जातीपातीचे राजकारण न करता शोषित आणि पीडितांचे उद्धारक झाले पाहिजे."

Dhananjay Munde retirement statement
Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

"समृद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो, तसाच वेळ आल्यास राजकारणातून माझाही एक्झिट असेल," असे मोठे विधान भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. तसेच, "आपण ज्या देशात राहतो, तिथे प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सकारात्मक टीका ऐकण्याची आपली ताकद असली पाहिजे आणि त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आपली तयारीही असली पाहिजे," असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "जेव्हा मी राजकारणात पहिले पाऊल ठेवले होते, तेव्हाच हे स्पष्ट केले होते की, जर मला राजकारण माझ्या विचारांशी सुसंगत वाटले नाही, तर समृद्धी महामार्गावरील एक्झिटसारखा माझाही राजकारणातून बाहेर पडण्याचा पर्याय खुला असेल. जो माणूस राजकारणातून बाहेर पडायला (एक्झिटसाठी) नेहमी तयार असतो, तोच खऱ्या अर्थाने बिंधास्तपणे राजकारण करू शकतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com