Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

Maharashtra weather today : हवामान विभागाने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Weather Alert : पुढील ४८ तास धोक्याचे
Weather Updates Saam TV
Published On

Yellow Alert Maharashtra rain update : राज्यात काही भागांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने (IMD) मोठा इशारा जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाचा पट्टा ओराई, सिधी, दाल्तोंगज, बंकुरा ते मणिपूरपर्यंत पसरला आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंतही कमी दाबाची रेषा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस आणि ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.

Weather Alert : पुढील ४८ तास धोक्याचे
Ration Card : फोनमध्ये ५ मिनिटांत डाऊनलोड करा रेशन कार्ड, सोप्या शब्दात जाणून घ्या पद्धत

मुंबई वेधशाळेचा हवामानाचा आजचा अंदाज काय?

मुंबई वेधशाळेच्या हवामानअंदाज नुसार सोमवारी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील.

Weather Alert : पुढील ४८ तास धोक्याचे
एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल 'इतक्या' कोटींचं उत्पन्न, सरनाईकांची माहिती

पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरून प्रवास करताना धुकं आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील नागरिकांनी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना उघड्यावर किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com