Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Pune IT engineer dies after 15th floor fall : पुण्यातील हडपसर येथे ३३ वर्षीय आयटी इंजिनियरचा १५ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून घरगुती वादाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Police outside a residential tower in Hadapsar, Pune, after an IT engineer's fatal fall.
Police investigate high-rise death in Pune's Hadapsar.Saam TV marathi AI Photo
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune IT Engineer Dies : पुण्यातील हडपसरमध्ये एका नामांकित आणि आलिशान गृहनिर्माण सोसायटीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका ३३ वर्षीय आयटी इंजिनियरचा १५ व्या मजल्यावरील फ्लॅटवरून खाली पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे. मात्र, ही घटना अपघात आहे की आत्महत्या? यामागे नक्की काय कारण आहे? याचा अधिक सखोल तपास पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात हडपसर येथील मगरपट्टा सिटी परिसरातील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय आयटी इंजिनियर तरुणाने आत्महत्या केली. मृताचे नाव राहुल वेधाभ्यास पटेल (वय ३३, रा. अमनोरा गोल्ड टॉवर, मगरपट्टा, साडेसतरा नळी, हडपसर, मूळ रा. ओडिशा) असे आहे. घरगुती वादातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

Police outside a residential tower in Hadapsar, Pune, after an IT engineer's fatal fall.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना बड्या नेत्याकडून थेट ऑफर, राज्याच्या राजकारणात खळबळ

राहुल पटेल हा कामानिमित्त पुण्यातील हडपसर येथे भाड्याने राहत होता. त्याचे आई-वडील ओडिशामध्ये राहतात. तो विवाहित असला तरी पत्नीसोबत मतभेद असल्याने दोघांमध्ये घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तो हडपसर मधील फ्लॅटमध्ये एकटाच वास्तव्यास होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास राहुलने इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारली.मोठा आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली असता तो इमारतीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

Police outside a residential tower in Hadapsar, Pune, after an IT engineer's fatal fall.
Parking Rules : सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभी करायची? पाहा काय सांगतो नियम

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी राहुलला रुग्णालयात दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Police outside a residential tower in Hadapsar, Pune, after an IT engineer's fatal fall.
'रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; काही तासांच्या फरकाने मुंडे भावंडांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महत्त्वाची सूचना

जर तुम्ही किंवा तुमची ओळख असलेली कोणतीही व्यक्ती मानसिक तणावात असेल किंवा आत्महत्येचे विचार मनात येत असतील, तर कृपया खचून जाऊ नका. मदतीसाठी खालील हेल्पलाइन क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधा:

किरण (Kiran - केंद्र सरकारची मानसोपचार हेल्पलाइन): 1800-599-0019

वंद्रेवाला फाउंडेशन (Vandrevala Foundation): 9999 666 555

टेलि-मानस (Tele-MANAS): 14416 / 1800 891 4416

आसरा (AASRA): 91-9820466726

(या सर्व सेवा २४ तास उपलब्ध असून तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com