14 IAS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Bihar 14 IAS Officers Transfer List And New Postings: बिहारमध्ये मध्यरात्री मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. 14 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पाटणा आयुक्तांसह पाच जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHAR
14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHARsaam tv
Published On

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्य सरकारने 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पत्रक जारी केले आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्री ही बादलीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या बदलीमध्ये पाटणाच्या आयुक्तांसह अनेक महत्वाच्या विभागांच्या सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार हे पत्रक प्रसिद्ध कररण्यात आले असून बिहारमधील सीतामढी, बेगूसराय, भोजपूर, कैमूर आणि सिवान या पाच जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHAR
प्रशासनात मोठे फेरबदल! 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

IAS अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी?

मंत्रिमंडळ सचिवालायाचे अपर मुख्य सचिव असलेले 1995 बॅचचे IAS अधिकारी अरविंद कुमार चौधरी यांच्याकडे पाटणा येथील BIPARD चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. १९९६ बॅचचे IAS अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांची ग्रामीण विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागातील चौकशी आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारीही राहणार आहे.

14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHAR
१६ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

जलसंपदा विभागाचे सचिव चंद्रशेखर सिंह यांच्याकडे लघु जलसंपदा विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. युवा रोजगार आणि कौशल्य विभागाचे विशेष सचिव नवदीप शुक्ला यांच्याकडे बिहार शिक्षण प्रकल्प परिषदेच्या संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेश कुमार यांची पाटणा विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनय कुमार यांना वित्त विभागाचे प्रधान सचिव करण्यात आले आहे. तर मयंक बडवडे यांची निगराणी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव संजय सिंह यांच्याकडे उत्पादन, मद्यनिषेध आणि नोंदणी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHAR
मध्यरात्री 68 IFS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

प्रशासकीय फेरबदलांतर्गत बिहारमधील पाच जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिवान - विजय प्रकाश मीणा

भोजपूर - मनेश कुमार मीणा

बेगूसराय - रिची पांडेय

सीतामढी - तनय सुल्तानिया

कैमूर - अनुराग कुमार

14 IAS OFFICERS TRANSFERRED IN BIHAR
बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

विजय प्रकाश मीणा हे नगरविकास विभागाचे अपर सचिव होते, तर मनेश कुमार मीणा हे खाण संचालक म्हणून कार्यरत होते. नवीन कुमार यांना मद्यनिषेध विभागाच्या अतिरिक्त पदभारातून मुक्त करण्यात आले आहे. विनोद सिंह गुंजियाल यांच्याकडे समाजकल्याण विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला असून, त्यांना शिक्षण विभागाच्या पदभारातून मुक्त करण्यात आले आहे. कार्तिकेय धनजी यांच्याकडे पीएचडी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव रौशन यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com