मध्यरात्री 68 IFS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

68 IFS Officers Transferred In Late Night Administrative Reshuffle: राज्य सरकारने मध्यरात्री भारतीय वन सेवेतील 68 IFS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये सात महिन्यांपूर्वी पदोन्नती मिळालेल्या 34 अधिकाऱ्यांचा समावेश असून, अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
68 IFS OFFICERS TRANSFERRED OVERNIGHT
68 IFS OFFICERS TRANSFERRED OVERNIGHTsaam tv
Published On

राज्य सरकारने रात्री उशिरा भारतीय वन सेवेतील 68 IFS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यपालांचे संयुक्त शासन सचिव डॉ. धीरज कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश जारी करण्यात ये आहेत. यामध्ये 7 महिन्यांपूर्वी पदोन्नती मिळालेल्या 34 अधिकऱ्यांचाही समावेश आहे. पदोन्नतीनंतर जवळपास सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या बदली आदेशात अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या बदलीत 14 अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदासोबत अतिरिक्त पदभार देण्यात आली आहे.

68 IFS OFFICERS TRANSFERRED OVERNIGHT
प्रशासनात मोठे फेरबदल! 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

वन विभागातील प्रधान मुख्य वनसंरक्षक हे सर्वात वरिष्ठ पद मानले जाते. राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये या पदाच्या नमांकनात बदल करण्यात आला आहे. आता प्रधान मुख्य वनसंरक्षक पदासोबत हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स हे देखील जोडण्यात आले आहे. 1991 बॅचचे आयएफएस अधिकारी अरिजित बॅनर्जी हे सध्या या पदावर कार्यरत होते. आता नव्या पदानुसार बदलीचे आदेश देण्यात आले आहे. म्हणजेच वन विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जबाबदारीत कोणताही मोठा बदल झालेला नसून, केवळ पदनामात बदल करण्यात आला आहे.

68 IFS OFFICERS TRANSFERRED OVERNIGHT
बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

काही महिन्यांपूर्वी भारतीय वन सेवेत पदोन्नती मिळालेल्या २२ आयएफएस अधिकाऱ्यांनाही आता नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदलाल प्रजापत, जगदीश प्रसाद दैया, भवानी सिंह, अशोक कुमार जैन, वीर भद्र मिश्र, शैतान सिंह देवडा, रेखाराम, पाटील तेजस विष्णू, आनंद कुमार, बलराम शर्मा, चंद्रपाल सिंह चौहान, इक्बाल सिंह, प्रदीप कुमार, सज्जन कुमार, योदवेंद्र सिंह चुंडावत, संदीप कुमार, अमित चौहान, जगदीप सिंह दहिया, प्रशांत गर्ग, आशीष व्यास, सुरेश अग्रवाल आणि राजेश कुमार शर्मा यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com