बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

West Bengal IAS officers transfer list July 2026: पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून जलपाईगुडीला नवे जिल्हाधिकारी मिळाले. आरोग्य, वन आणि आदिवासी विकास विभागातही महत्त्वाचे बदल.
West Bengal Government Announces Major IAS Transfers; Aditi Chaudhary Appointed as New Jalpaiguri DM
West Bengal Government Announces Major IAS Transfers; Aditi Chaudhary Appointed as New Jalpaiguri DMsaam tv
Published On

पश्चिम बंगालच्या पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सूवेंदु अधिकारी यांच्या सरकारने 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जलपाईगुडी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच वन विभाग आणि आदिवासी विकास विभागासह अनेक विभागांमध्ये सचिवांची अदलाबदल करण्यात आली आहे. इतर अनेक पदांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 30 जुलै रोजी बदली आणि नियुक्त्यासंदर्भातील आदेश राज्यपालांच्या कार्यालयातून जारी करण्यात आला.

आयएएस अधिकारी के. राधिका अय्यर, वरिष्ठ विशेष सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांची बदली करून त्यांची पंचायत आयुक्त आणि पी अँड आरडी विभागातील वरिष्ठ विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ललित अग्रवाल, सचिव, पश्चिम बंगाल माहिती आयोग यांना हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनर या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आसिता मिश्रा, वरिष्ठ विशेष सचिव, वन विभाग यांची बदली करून त्यांना आदिवासी विकास विभागात वरिष्ठ विशेष सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

West Bengal Government Announces Major IAS Transfers; Aditi Chaudhary Appointed as New Jalpaiguri DM
राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी

जलपाईगुडीचे नवे जिल्हाधिकारी कोण?

जलपाईगुडी जिल्हाधिकारी पदावर २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी अदिती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या आसनसोल-दुर्गापूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या सीईओ म्हणून कार्यरत होत्या.

West Bengal Government Announces Major IAS Transfers; Aditi Chaudhary Appointed as New Jalpaiguri DM
IAS Transfers : प्रशासनात मोठा बदल! ८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे कोणाची होणार नियुक्ती? वाचा

ज्योतिष्मान चट्टोपाध्याय, सचिव, हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनर यांची बदली करून त्यांना पी अँड एआर विभागात ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आपला सेट, आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची बदली करून त्यांना वन विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com