प्रशासनात मोठे फेरबदल! 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Madhya Pradesh 20 IAS Officers Transfer Full List: मध्यप्रदेशमध्ये नवीन मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले गेले आहेत.
MAJOR IAS RESHUFFLE IN MADHYA PRADESH: 20 OFFICERS TRANSFERRED, NEW APPOINTMENTS ANNOUNCED
MAJOR IAS RESHUFFLE IN MADHYA PRADESH: 20 OFFICERS TRANSFERRED, NEW APPOINTMENTS ANNOUNCEDsaam tv
Published On

मध्यप्रदेशमध्ये नवीन मुख्य सचिव अशोक बर्नवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चर्चा करून 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदली आणि नवीन नियुक्त्यांचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून अनेक जिल्ह्याचे कलेक्टरही बदलण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई यांच्याकडे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2027 च्या आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातील जबाबदारीसह ते उद्योग आणि MSME विभागाचे कामकाज देखील बघणार आहेत. ही जबाबदारी याआधी राघवेंद्र सिंह यांच्याकडे होती. राघवेंद्र सिंह यांची वन विभागाच्या प्रमुख सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी संदीप यादव यांची जागा घेतली आहे. संदीप यादव यांना जलसंधारण विभागाचे प्रमुख सचिव करण्यात आले असून केन-बेतवा आणि पार्वती कालीसिंध या महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

रमेश कुमार यांच्याकडे महसूल विभागासोबतच नर्मदा व्हॅली डेव्हलपमेंट अथॉरिटी (NVDA) चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संदीप यादव आणि रमेश कुमार यांनी राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी डॉ. राजेश राजौरा यांच्या जागी जबाबदारी स्वीकारली आहे. डॉ. राजौरा यांची आता आरसीपीव्ही नरोन्हा प्रशासन आणि व्यवस्थापन अकादमीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

MAJOR IAS RESHUFFLE IN MADHYA PRADESH: 20 OFFICERS TRANSFERRED, NEW APPOINTMENTS ANNOUNCED
भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते अंत्यविधीत, राजकीय वर्तुळात शोककळा

आरोग्य, ऊर्जा आणि कृषी विभागात बदल

लोकनिर्माण विभागाचे प्रमुख सचिव सुखवीर सिंह यांना अतिरिक्त जबाबदारी देत आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण विभागही सोपवण्यात आला आहे. हे विभाग यापूर्वी मुख्य सचिव अशोक बर्नवाल यांच्याकडे होते. केसी गुप्ता यांना कृषी उत्पादन आयुक्तपदासोबत उद्यानिकी विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर प्रमुख सचिव मनीष सिंह (सीनियर) यांच्याकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंदौर विभागाचे आयुक्त सुदाम खाडे यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार पुरुषोत्तम यांना उपसचिव म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आले असून ते मंडी बोर्डाची जबाबदारीही सांभाळणार आहेत. सिद्धार्थ जैन यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

MAJOR IAS RESHUFFLE IN MADHYA PRADESH: 20 OFFICERS TRANSFERRED, NEW APPOINTMENTS ANNOUNCED
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा शिक्षणमंत्री कोण होणार? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अजय कटेसरिया यांची रतलाम जिल्ह्याच्या कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नती नियमांची अंमलबजावणी आणि समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. भास्कर लक्ष्यकार यांची इंदौर विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सचिन सिन्हा यांना लोक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव करण्यात आले आहे.

जॉन किंग्सले एआर यांना औद्योगिक धोरण व गुंतवणूक प्रोत्साहन विभागाचे सचिव करण्यात आले असून त्यांच्याकडे MSME विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

रत्नाकर झा यांची अनूपपूर जिल्ह्याच्या कलेक्टरपदी नियुक्ती झाली असून त्यांनी हर्षल पंचोली यांची जागा घेतली आहे. हर्षल पंचोली यांना भोपालमधील EPCO संस्थेचे कार्यकारी संचालक करण्यात आले आहे.

केदार सिंह यांची लोकनिर्माण विभागात अतिरिक्त सचिवपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मिशा सिंह यांची शहडोल जिल्ह्याच्या कलेक्टरपदी नियुक्ती झाली आहे.

मंदसौरच्या कलेक्टर अदिती गर्ग यांची भोपालमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी दिव्यांक सिंह यांची मंदसौर कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुख्य सचिव कार्यालयातील उपसचिव गुरु प्रसाद यांची खरगोन जिल्ह्याच्या कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सतना महानगरपालिकेचे आयुक्त शेर सिंह मीणा यांना आगर मालवा जिल्ह्याचे कलेक्टर करण्यात आले असून प्रीती यादव यांची एमपी औद्योगिक विकास महामंडळ, इंदौर येथे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com