Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

Dhule Politics : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या शुभांगी पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपली पुढील दिशाही स्पष्ट केली.
ठाकरेंना धक्का देणाऱ्या महिला नेत्यावर शिंदे सेनेकडून मोठी जबाबदारी
Eknath Shinde and Uddhav Thackeraysaam tv
Published On

भूषण अहिरे, धुळे | साम टीव्ही

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का मिळाला आहे. ठाकरेंच्या समर्थक आणि पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पक्षात येताच मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची उपनेतेपदी निवड केली आहे. जबाबदारी मिळताच शुभांगी पाटील यांनी युवकांचा मुद्दा हाती घेतला असून, आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे धक्के काही नवीन नाहीत. त्याचे सर्वाधिक हादरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसत आहेत. गेल्याच महिन्यात सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर मुंबईतील खंदे समर्थक असलेल्या सचिन अहिर यांनीही ठाकरेंच्या पक्षाला रामराम केला. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

ठाकरेसेनेतून होणारी आऊटगोईंगची झळ कमी होत नाहीत, तोच उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला. धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क असलेल्या नेत्या अशी ओळख असलेल्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या भागामध्ये शिंदेंच्या सेनेची ताकद वाढेल, असे मानले जात आहे. तर ठाकरेंना हा मोठा हादरा आहे.

शुभांगी पाटील यांनी शिंदेसेनेत (Shinde camp) प्रवेश करताच त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिंदेसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुभांगी पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. काल, शुक्रवारी रात्री उशिरा श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक,भरत गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता.

शुभांगी पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी समाधान व्यक्त करतानाच, कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्याच्या कामांना वेग देऊन युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

ठाकरेंना धक्का देणाऱ्या महिला नेत्यावर शिंदे सेनेकडून मोठी जबाबदारी
Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com