इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

india aghadi news : इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ३० खासदार असलेला पक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.
इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ
Published On
Summary

इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का

डीएमके पक्षाने घेतला मोठा निर्णय

डीएमके पक्षाची काँग्रेसवरील नाराजी उघड

इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. डीएमके पक्षाने इंडिया आघाडीच्या ८ जून रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेत २२ आणि राज्यसभेत ८ खासदार असलेल्या डीएमके पक्षाने काँग्रेसवर नाराजी दर्शवत बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

द्रविड मुनेत्र कडगम पक्षाने गुरुवारी स्पष्ट केलं की, 'तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला 'विश्वासघात' केल्याची टीका केली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आमचा पक्ष ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने केलेल्या विश्वासघातामुळे आमचे कार्यकर्ते दुखावले आहेत, असं पक्षाने निवेदनात म्हटलं आहे.

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ
देशाच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार? भाजपची २२ लोकसभा अन् ८ राज्यसभा खासदार असलेल्या पक्षावर नजर

'डीएमके'ने निवेदनात पुढे स्पष्ट केलं की, 'आमचा पक्ष या बैठकीत सहभागी होणार नाही. परंतु देशाशी संबंधित मुद्द्यांसाठी आवाज उचलत राहील. या बैठकीत सहभागी होणाऱ्या पक्षांनी राष्ट्रहित आणि जनकल्याणाचे मुद्दे हाती घेतल्यास आम्ही त्यांचं समर्थन करू. त्यावेळी आमच्या भूमिका देखील स्पष्टपणे मांडू'.

डीएमके काँग्रेसवर नाराज का झाली?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने सर्वाधिक १०८ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसने टीव्हीके पक्षाला समर्थन दिलं होतं. काँग्रेसच्या पाच आमदारांनी थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. परंतु काँग्रेसच्या याच भूमिकेवरून डीएमके पक्षाने नाराजी दर्शवली.

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ
इंडिया आघाडी फुटली; २२ लोकसभा खासदार असलेल्या पक्षाने घेतला मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या भूमिकेनंतर डीएमके पक्षाने लोकसभेत त्यांच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलण्याची मागणी केली होती. यावरून दोन्ही पक्षात ठिणगी पडल्याचे पहिल्यांदा स्पष्ट झाले होते. आता दोन्ही पक्षांत दिवसेंदिवस दुरावा वाढताना दिसत आहे. डीएमके पक्षाच्या मागणीला आज अधिकृत परवानगी मिळाली. त्यामुळे लोकसभेत काँग्रेस आणि डीएमके खासदार वेगवेगळे बसल्याचे पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com