बड्या नेत्याने भाजप फोडला; राज्य सचिवाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण फिरणार?

tamil nadu political news : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्य सचिवाने तडकाफडकी राजीनामा दिलाय.
BJP Leader Launch New Political Party :
tamil nadu politics Saam tv
Published On
Summary

तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ

अन्नामलाई यांच्यानंतर आणखी एका नेत्याने भाजपची साथ सोडली

भाजपचे तामिळनाडू राज्य सचिवाने भाजपचा दिला राजीनामा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अन्नामलाई यांनी भाजपची साथ सोडली. अन्नामलाई यांच्यानंतर तामिळनाडूत भाजपला लागलेली गळती सुरूच आहे. अन्नामलाई यांच्यानंतर आता भाजपचे तामिळनाडू राज्य सचिव अमर प्रसाद रेड्डी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

भाजपमध्ये मागील १३ वर्षांपासून काम करणाऱ्या अमर प्रसाद रेड्डी यांनी पक्षासोबतचं जुनं नातं संपवलं आहे. अमर प्रसाद रेड्डी हे तामिळनाडूतील भाजपचा सक्रिय आणि प्रमुख चेहरा मानला जायचा. अन्नामलाई यांच्यानंतर अमर प्रसाद रेड्डी यांच्या रुपाने भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

BJP Leader Launch New Political Party :
४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

सोशल मीडियावर निर्णय जाहीर करताना अमर प्रसाद रेड्डी यांनी म्हटलं की, मी अन्नामलाई यांच्यासोबत नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहे. मी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजपला राजीनामा दिल्यानंतर आता पुढील राजकीय वाटचाल ही अन्नामलाई यांच्यासोबत करणार आहे'.

कोण आहेत अमर प्रसाद रेड्डी?

अमर प्रसाद रेड्डी यांनी २०१३ साली भाजपमध्ये प्रवेश केला. रेड्डी यांनी पक्षाच्या क्रीडा आणि कौशल्य विकास विभागाचे संयोजक म्हणूनही भूमिका बजावली. त्यांनी मोदी कबड्डी लीगचेही आयोजन केलं होतं. या स्पर्धेत ६०,००० हून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला होता. 'एन मन एन मक्कल यात्रेचे मुख्य आयोजक म्हणूनही भूमिका बजावली आहे. त्यानंतर त्यांनी आज बुधवारी भाजपला रामराम ठोकला. त्यांनी तब्बल १३ वर्षांची साथ सोडून नवा मार्ग निवडला आहे.

BJP Leader Launch New Political Party :
भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

भाजपचे तामिळनाडू उपाध्यक्ष करुणा नागराजन यांनी पक्ष सोडताना शुक्रवारी म्हटलं होतं की, भाजपला राजीनामा देऊन अन्नामलाई यांना साथ देणार आहे. मी माझ्या शेकडो समर्थकांसह भाजपच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अन्नामलाई यांच्या राजकीय आंदोलनात सहभागी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com