महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! तिसऱ्या अपत्यासाठीही १ वर्षाची प्रसूती रजा; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Maternity Leave : तमिळनाडू सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही ३६५ दिवसांची म्हणजेच पूर्ण एका वर्षाची प्रसूती रजा मिळणार आहे. या निर्णयामागील कारण आणि महिला कर्मचाऱ्यांना होणारे फायदे जाणून घ्या.
Maternity Leave
Maternity LeaveSaam Tv
Published On

Tamil Nadu 365 days maternity leave for third child : नोकरदार महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तमिळनाडू सरकारने महिला कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून, आता प्रसूती रजेच्या कालावधीत थेट ३६५ दिवसांचा, म्हणजेच पूर्ण एका वर्षांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम तिसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळीही लागू असणार आहे.

तमिळनाडू सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्याचे मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री यांनी विधानसभेत यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

Maternity Leave
Maharashtra politics : सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

असा निर्णय घेण्यामागचे नेमके कारण काय?

अनेक ठिकाणी पहिल्या दोन अपत्यांसाठीच प्रसूती रजा दिली जाते. पण तमिळनाडू सरकारने तिसऱ्या अपत्यासाठीही पूर्ण एका वर्षाची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामागे राज्यातील घसरता प्रजनन दर (Declining Fertility Rate) हे मुख्य कारण आहे. राज्यातील लोकसंख्येचा तोल सांभाळण्यासाठी आणि महिला कर्मचाऱ्यांना तिसऱ्या बाळंतपणाच्या काळात पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने प्रशासनाने ही सवलत लागू केली आहे.

Maternity Leave
हॉटेलच्या रूममधून मुलीच्या भयंकर किंकाळ्या; दार उघडताच समोर हादरवणारं दृश्य, प्रियकर रेल्वे कर्मचाऱ्याचे भयानक कृत्य

३६५ दिवसांची भरपगारी रजा

महिला कर्मचाऱ्यांना बाळाच्या संगोपनासाठी आता पूर्ण १ वर्षाची प्रसूती रजा मिळेल. केवळ पहिल्या दोनच नव्हे, तर तिसऱ्या अपत्याच्या वेळीही ही रजा महिलांना घेता येणार आहे. तमिळनाडू विधानसभेत या धोरणाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामुळे नोकरदार महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या निर्णयामुळे महिलांना त्यांच्या करिअरसोबतच कुटुंबाची आणि नवजात बालकाची काळजी घेणे अधिक सोपे होणार असून, इतर राज्यांमध्येही असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maternity Leave
Hotel Fire : मध्यरात्री २ वाजता हॉटेलमध्ये भीषण आग, ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, उपचारासाठी आले अन् काळाने गाठले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com