Maharashtra politics : सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Sangram Jagtap booked for road blockade protest in Ahilyanagar : अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात जमावबंदी आदेशाचा भंग करून रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangram Jagtap booked for road blockade protest in Ahilyanagar
Sangram Jagtap booked for road blockade protest in Ahilyanagarसाम टीव्ही मराठी
Published On

अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा चौक येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून 'रस्ता रोको' आंदोलन केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांवर मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची काही अज्ञातांनी विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी चिंचोली काळदात फाटा चौक येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत आंदोलकांनी श्रीगोंदा ते जामखेड आणि कर्जत ते मिरजगाव या मार्गांवरील वाहतूक रोखून धरली होती, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बळीराम गोपीनाथ काकडे यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

Sangram Jagtap booked for road blockade protest in Ahilyanagar
Hotel Fire : मध्यरात्री २ वाजता हॉटेलमध्ये भीषण आग, ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, उपचारासाठी आले अन् काळाने गाठले

त्यांच्या फिर्यादीवरून आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, ॲड. आकाश हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंह शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव आणि ऋषीकेश काळदाते यांच्यासह इतर १०० ते १५० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Sangram Jagtap booked for road blockade protest in Ahilyanagar
तुम्हीही फ्लॅट किंवा PG भाड्याने देताय? मग ही बातमी आधी वाचा, नाहीतर तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक झंझाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com