तुम्हीही फ्लॅट किंवा PG भाड्याने देताय? मग ही बातमी आधी वाचा, नाहीतर तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

tenant verification Low : पुण्यात भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी १७० घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाडेकरू व्हेरिफिकेशन का आवश्यक आहे आणि माहिती कशी द्यायची, जाणून घ्या.
tenant police verification rules for landlords
tenant police verification rules for landlordsसाम टीव्ही मराठी
Published On

tenant police verification rules for landlords : पुण्यात घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांविरोधात पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील खडक, शिवाजीनगर, आंबेगाव, वाघोली यांसह शहरातील तब्बल १५० हून अधिक घरमालक आणि पीजी (PG) चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे पुण्यात घर भाड्याने देणाऱ्या मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Housing Society Rules)

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक पुण्यात येत असतात. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच भागांत भाड्याच्या घरांना मोठी मागणी असते. शहरभरात मोठ्या प्रमाणावर फ्लॅट, दुकाने आणि पीजी भाड्याने दिले जातात. मात्र, भाडेकरू किंवा पीजीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची आवश्यक माहिती पोलिसांना देण्याकडे काही घरमालक आणि पीजी चालक सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळेच प्रशासनाने ही कडक कारवाई सुरू केली आहे.

tenant police verification rules for landlords
फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

पुणे शहर पोलीस हद्दीत गेल्या काही दिवसांपासून भाडेकरूंच्या माहितीची पडताळणी (Tenant Verification) करण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे. ही माहिती पोलीस यंत्रणेला न दिल्यामुळे किंवा त्यात त्रुटी आढळल्यामुळे आतापर्यंत पुणे शहरातील सुमारे १७० घरमालक आणि पीजी (PG) चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

tenant police verification rules for landlords
रात्रीत मोठा प्रशासकीय फेरबदल! एकाच झटक्यात ४३ IPS अधिकाऱ्यांची उचलबांगडी, पाहा कोणाची कुठे झाली बदली

माहिती देणे का बंधनकारक आहे?

शहराच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन होणे अत्यंत आवश्यक आहे. 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १६३ अन्वये पोलीस प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश/नोटीस जारी केली असून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे क्रमप्राप्त (बंधनकारक) आहे. माहिती न दिल्यास BNSS च्या कलम २२३ अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल केला जातो.

tenant police verification rules for landlords
दिवसभर लेकीचा शोध घेतला, पण शेवटी शेतात जे दिसलं त्याने कुटुंब हादरलं! पुण्यातील 'त्या' घटनेने उडाली खळबळ

भाडेकरूची माहिती कशी सादर करावी?

सिटिझेन पोर्टल (Citizen Portal), शासकीय किंवा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) जाऊन माहिती अपलोड करता येते.

नोंदणीकृत भाडे करार (Registered Rent Agreement) असल्यास, त्याची माहिती आपोआप पोर्टलवर सिंक (Sync) होऊन अपलोड करता येते.

स्थानिक पोलीस ठाण्यात (Local Police Station) प्रत्यक्ष जाऊन फॉर्म भरून भाडेकरूची माहिती देता येते.

सुरक्षेच्या कारणास्तव सर्व घरमालक व पीजी चालकांनी न चुकता आणि वेळेत भाडेकरूंची माहिती पोलीस यंत्रणेला देऊन प्रशासनास सहकार्य करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com