रात्रीत मोठा प्रशासकीय फेरबदल! एकाच झटक्यात ४३ IPS अधिकाऱ्यांची उचलबांगडी, पाहा कोणाची कुठे झाली बदली

43 IPS officers transferred : दिल्ली पोलिसांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून ४३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक, सुरक्षा, EOW, दक्षता आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
Delhi Police reshuffle, 43 IPS officers transferred
Delhi Police reshuffle, 43 IPS officers transferredSaam TV
Published On

43 IPS officers transferred in Delhi Police reshuffle : दिल्ली पोलिसांच्या प्रशासनात मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. एकाच आदेशाने तब्बल ४३ वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच सर्वात मोठा फेरबदल आहे. या नव्या आदेशानुसार ८ विशेष पोलीस आयुक्त (Special CPs), अनेक सहआयुक्त (Joint CPs) आणि २१ उपायुक्त (DCPs/Addl. DCPs) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे.

या मोठ्या फेरबदलात व्हीव्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि वाहतूक विभागाच्या महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या फेररचनांचा समावेश आहे. अजय चौधरी यांची वाहतूक विभागात, तर मनिष अग्रवाल यांची सुरक्षा विभागात बदली झाली आहे. याशिवाय, आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि दक्षता (Vigilance) विभागासारख्या महत्त्वाच्या कक्षांनाही नवे प्रमुख मिळाले आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा अलीकडच्या काळातील काही वादग्रस्त आणि महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रंगली असली, तरी प्रशासकीय कारणास्तव आणि कामकाजात अधिक पारदर्शकता व गती आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Delhi Police reshuffle, 43 IPS officers transferred
Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय, पाहा कधी होणार मतदान?

कुणाची कुठे झाली बदली? यादी एका क्लिकवर

विशेष पोलीस आयुक्त

गरिमा भटनागर – Spl. CP/EOW आणि MD/DPHCL (अतिरिक्त कार्यभार)

मनिष अग्रवाल – Spl. CP/PSD (संरक्षण व सुरक्षा विभाग)

अजय चौधरी – Spl. CP/Traffic (वाहतूक विभाग)

डेव्हिड लालरिनसांगा – Spl. CP/OPS (PCR & Communication) + अतिरिक्त कार्यभार SPUNER

अतुल कटियार – Spl. CP/Welfare & Legal Division

के. जगदेसन – Spl. CP/Intelligence Division

विवेक किशोर (अरुणाचल प्रदेशातून बदली) – Spl. CP/SPUWAC & Licensing

सिंधू पिल्लाई (A&NI मधून बदली) – Spl. CP/Vigilance & Perception Management and Media Cell (अतिरिक्त कार्यभार)

सह पोलीस आयुक्त

वीणू बन्सल – Jt. CP/SPUWAC & SPUNER

सुमन गोयल – Jt. CP/Western Range

रजनीश गुप्ता – Jt. CP/Transport Range

जतीन नरवाल – Jt. CP/Special Branch

मिलिंद महादेव डुंबरे – Jt. CP/Eastern Range (०१/०९/२०२६ पासून लागू)

दीपक पुरोहित – Jt. CP/Licensing

नुपूर प्रसाद – Jt. CP/New Delhi Range

अजय क्रिशन शर्मा (गोव्यातून बदली) – Jt. CP/HQ

अप्पर पोलीस आयुक्त

मोनिका भारद्वाज – Addl. CP/Crime

ए. कोअन (A&NI मधून बदली) – Addl. CP/HQ Pers

संजय भाटिया – Addl. CP/IFSO

दिनेश कुमार गुप्ता – Addl. CP/DPHCL

वर्षा शर्मा (गोव्यातून बदली) – Addl. CP/EOW

प्रतीक्षा गोदारा – Addl. CP/Traffic (HQ)

जितेंद्र कुमार मीना (A&NI मधून बदली) – Addl. CP/Vigilance

निधिन वालसन – Addl. CP/Special Branch

पोलीस उपायुक्त व अप्पर उपायुक्त

ए. के. लाल (पुदुच्चेरीवरून बदली) – DCP/GA

राजा बांठिया – DCP/Tech. & PI

हेमंत तिवारी – DCP/Special Branch

विनीत कुमार – DCP/South East District

मनजीत (चंदिगढवरून बदली) – Addl. DCP-I/New Delhi District

निहारिका भट्ट – DCP/North District

गितांजा खंडेलवाल (चंदिगढवरून बदली) – Addl. DCP-I/Shahdara

सत्यवान गौतम (अरुणाचल प्रदेशातून बदली) – DCP/PCR and Operations (अतिरिक्त कार्यभार)

Delhi Police reshuffle, 43 IPS officers transferred
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच मोठा हाहाकार, महाराष्ट्रावर धडकणार 'हे' महासंकट? स्काईमेटचा थेट इशारा, पाहा काय आहे संकट...

दिल्ली पोलीस दलात झालेला हा व्यापक फेरबदल शहराची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नवीन आयुक्त अनुराग कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पहिल्याच मोठ्या खांदेपालटमुळे प्रशासकीय कामाला नवीन गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहतूक, गुन्हे शाखा, व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि महिला-बाल सुरक्षा यांसारख्या संवेदनशील विभागांमध्ये नवीन आणि अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com