फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

housing society rules : हाउसिंग सोसायटीत भाडेकरूने पार्किंग, कचरा, आवाज किंवा इतर नियम मोडल्यास दंड कोणाला भरावा लागतो? फ्लॅट मालकाची जबाबदारी, भाडेकरारातील अटी आणि सोसायटीच्या दंडाचे नियम जाणून घ्या.
Maharashtra Housing Society Rules Explained
Maharashtra Housing Society Rules ExplainedSaam TV Marathi
Published On

who pays housing society fine for tenant violation in Maharashtra : हाउसिंग सोसायटीत राहताना भाडेकरूने एखादा नियम मोडला, तर त्याचा दंड घरमालकाने की भाडेकरूने भरायचा? हा प्रश्न अनेकदा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वादाचे कारण ठरतो. बहुतांश सोसायट्यांमध्ये पार्किंग, कचरा व्यवस्थापन, रात्रीचा आवाज किंवा पाळीव प्राण्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्यास सोसायटी प्रशासन थेट घरमालकालाच दंड ठोठावते.

कायदा आणि 'महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार' (Co-operative Housing Society Rules) सोसायटीचे थेट देणे-घेणे हे केवळ फ्लॅटच्या मूळ मालकाशी असते, भाडेकरूशी नाही. त्यामुळे भाडेकरूने काही चूक केली तरी सोसायटी दंड वसूल करण्यासाठी घरमालकालाच जबाबदार धरते.

पण अशा आर्थिक फटक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरमालक भाडेकरारा (Rent Agreement) मध्ये विशिष्ट अटींचा समावेश करू शकतात. सोसायटीचे नेमके नियम काय सांगतात, दंड कोणाकडून वसूल केला जातो आणि घरमालकाने स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Housing Society Rules Explained
Housing Society : तुम्हीही सोसायटीतील झाडं छाटण्याच्या तयारीत आहात? आधी ही बातमी वाचा, नाहीतर थेट जेलची हवा

सोसायटी नेहमी फ्लॅट मालकालाच दंड का लावते?

गृहनिर्माण संस्थेचा (सोसायटीचा) थेट व्यवहार फक्त फ्लॅटच्या मूळ मालकाशी असतो, तिथे राहणाऱ्या भाडेकरूशी नाही. त्यामुळे भाडेकरूने एखादी चूक किंवा नियमांचे उल्लंघन केले, तरी सोसायटीच्या नियमांनुसार त्याला जबाबदार घरमालकालाच धरले जाते आणि दंडही मालकालाच ठोठावला जातो. सोसायटी भाडेकरूला थेट समज देऊ शकते; पण दंडाची वसुली मात्र मालकाकडूनच केली जाते. त्यामुळे भाडेकरूच्या चुकीमुळे स्वतःचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून, घरमालकाने भाडेकरारात (Rent Agreement) दंड भाडेकरूनेच भरावा अशी स्पष्ट अट टाकणे गरजेचे आहे.

सोसायटीच्या दृष्टीने मूळ मालक/सभासद (Owner/Member) हाच मुख्य जबाबदार घटक राहतो. पण भाडेकरू (Tenant/Licensee/Occupant) देखील जागेचा वापर आणि वापरासंबंधीच्या सोसायटीच्या लागू पोटनियमांना (Bye-laws) आणि वैध नियमांना बांधील असतो. एखाद्या विशिष्ट दंडाची जबाबदारी कोणावर असेल, हे सर्वप्रथम तो दंड आकारण्याचा अधिकार सोसायटीला कायद्याने आहे का? आणि तो वैध आहे का? यावर अवलंबून असते. मालक आणि भाडेकरू यांच्यातील करारात दंडाची जबाबदारी कोणावर टाकली आहे, यावर ठरते.
- ॲड. प्रसन्नकुमार जोशी यांनी सांगितले.
Maharashtra Housing Society Rules Explained
Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

जेव्हा सोसायटी एखाद्या भाडेकरूच्या चुकांसाठी मालकावर मोठा दंड ठोकते. सरकारी मॉडेल बाय-लॉज (Model Bye-laws) मध्येच "अतिरिक्त किंवा अवाजवी दंडाबाबत" (Excess Fine) आमसभेकडे (General Body) दाद मागण्याची किंवा तक्रार निवारणाची तरतूद आहे. त्यामुळे सोसायटीच्या कार्यकारिणी समितीला (Managing Committee) अमर्याद दंडाधिकार आहेत, असे अजिबात म्हणता येणार नाहीसेही ॲड. प्रसन्नकुमार जोशी यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेय.

Maharashtra Housing Society Rules Explained
महत्त्वाची बातमी! सोसायटीच्या मेंटेनन्सवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियमांत झाला बदल; जाणून घ्या नवीन गणित

दंडाची रक्कम भाडेकरूकडून कशी वसूल करावी?

जर तुम्ही भाडेकरारात (Rent Agreement) सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणारा दंड भाडेकरूच भरेल अशी अट स्पष्टपणे लिहिली असेल, तर तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळते. अशा वेळी सोसायटीला भरलेला दंड तुम्ही भाडेकरूकडून दोन मार्गांनी वसूल करू शकता. तुम्ही भाडेकरूला सोसायटीच्या दंडाची पावती दाखवून ती रक्कम वेगळी भरायला सांगू शकता. भाडेकरूने पैसे देण्यास नकार दिला किंवा फ्लॅट रिकामी करताना, तुम्ही ही दंडाची रक्कम त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटमधून (सुरक्षा ठेवीतून) कापून घेऊ शकता.

सोसायटी कोणकोणत्या कारणांसाठी दंड (पेनल्टी) लावते?

  • स्वतःची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेवर किंवा पाहुण्यांच्या (विजिटर) पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे.

  • रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, पार्ट्या करणे किंवा शेजाऱ्यांना त्रास होईल असा गोंधळ घालणे.

  • लिफ्ट, पॅसेज (कॉरिडॉर), क्लब हाउस किंवा गार्डन यांसारख्या सोसायटीच्या सामायिक भागांत तोडफोड किंवा नुकसान करणे.

  • ओला आणि सुका कचरा वेगळा न ठेवणे किंवा कुठेही उघड्यावर कचरा फेकून घाण करणे.

  • सोसायटीचे सुरक्षा नियम, उपनियम (By-laws) किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com