CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?

CNG- PNG Price: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. वाचा नवीन दर किती?
CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?
CNG- PNG PriceSaam Tv
Published On

Summary -

  • सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण

  • सीएनजी प्रति किलो ३.५० रुपये तर पीएनजी २ रुपये स्वस्त

  • गृहिणी आणि वाहन चालकांना थेट फायदा होणार

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. सीएनजी-पीएनजीचे दर कमी झाल्यामुळे वाहतूक क्षेत्राला आणि गृहिणींना थेट फायदा होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळने (PNGRB) यूनिफाइड पाइपलाइन टॅरिफ लागू केल्यानंतर सीएनजीचे दर प्रति किलो ३.५० रुपयांपर्यंत कमी झाले आहे. तर घरगुती पीएनजीचे दर २ रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरपर्यंत कमी झाले आहे. सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.

CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?
Mumbai CNG Crisis: मुंबईकरांचे हाल! ऑटो अन् टॅक्सी ठप्प, बसमध्ये प्रचंड गर्दी; नेमकं कारण काय ?

नवी किमतींमुळे सीएनजी पेट्रोलपेक्षा ४३ टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहे. त्यामुळे सीएनजी हा किफायतशीर आणि स्वच्छ पर्यायी इंधन ठरले आहे. कंपनीने असे सांगितले की, किमती कमी झाल्यामुळे जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च कमी होईल. गृहिणींच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर परिणाम होईल. तसंच त्याच्या घर खर्चात बचत होईल. तर दुसरीकडे सीएनजीचे दर कमी झाल्यामुळे प्रवासी आणि व्यावसायिक दोन्ही विभागातील वाहन चालकांना इंधनासाठी लागणारा खर्च कमी होईल.

CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?
Best CNG Cars: सर्वात जास्त मायलेज देण्याऱ्या 10 टॉप CNG कारची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com