Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Ahilyanagar Couple Assaults: शिर्डी जवळीक सावळीविहीर येथील सीएनजी पंपावर दाम्पत्याला मारहाण झाली आहे. हे दाम्पत्य साईदर्शनानंतर मुंबईकडे परतत होते. जाब विचारल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.
Ahilyanagar Couple Assaults:
Shocking scene near Shirdi — CNG pump staff assault couple after dispute over gas filling delay.saam tv
Published On
Summary
  • सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी.

  • शिर्डी जवळीक सावळीविहीर येथील सीएनजी पंपावरील घटना

  • जाब विचारल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांची थेट महिलेला मारहाण

सचिन बनसोड, साम प्रतिनिधी

अहिल्यानगरमधील शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर येथील एका सीएनजी पंपावर दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तासन् तास पंपावर वाट पाहूनही गॅस भरून न दिल्यावरून पंपावरील कर्मचारी आणि दामत्यामध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केल्या. त्यानंतर पंपावरील कर्मचारी आणि मालकाने दाम्प्त्याला मारहाण केली.

Ahilyanagar Couple Assaults:
Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

नमिता घरद असं मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. साईदर्शनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या नमिता घरद यांच्यासह त्यांच्या पतीला पंप मालक आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. गॅस भरण्यासाठी वेळ का लागतोय. नंबर न लावता मागील लोकांना का गॅस भरून देत आहात असा जाब घरद दाम्पत्यानं विचारल्यानं पंप चालकाने त्यांना मारहाण केली.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 115, 352, 351 अंतर्गत आर जे पेट्रोलियमच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ahilyanagar Couple Assaults:
Buldhana Crime News: भरदिवसा युवकाची हत्या, संत नगरी शेगाव हादरलं

सीएनजी गॅस पंपावर तासंतास रांगेत उभे राहूनही सीएनजी मिळत नव्हता. ओळखीच्या लोकांना सीएनजी रांगेत न लागताच गॅस भरून दिला जात होता. त्याचा जाब विचारल्याने घरद यांना मारहाण झालीय. नमिता घरद आणि त्याचे पती शुक्रवारी सीएनजी पंपावर वाहनात सीएनजी भरण्यासाठी आले गेले होते. त्यावेळी सीएनजी संपला होता त्यामुळे ते परत गेले. शुक्रवारी सीएनजी मिळाला नाही म्हणून ते आज परत पंपावर आले.

पण गॅस भरण्यासाठी रांगेत लागलेली वाहने पुढे सरकत नसल्यानं नमिता घरद यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्याने त्यांना तांत्रिक कारण सांगितलं. पण पंप मालकाचे नातेवाईक जेव्हा सीएनजी भरण्यासाठी आले तेव्हा त्यांचा नंबर लगेच लावण्यात आला. त्यावेळी घरद दम्पत्यानं हटकलं. त्यानंतर पंप कर्मचारी आणि दम्पत्यामध्ये बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली. त्यानंतर पंप मालकाने आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com