रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

Bangladesh Cox's Bazar Resort Fire Kills 10 People: बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यातील इनानी परिसरातील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या रिसॉर्टला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.
Bangladesh Cox's Bazar resort fire kills 10 people
Bangladesh Cox's Bazar resort fire kills 10 peoplesaam tv
Published On: 

बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या एका रिसॉर्टला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 10 जणांचा होरपोळून मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास इनानी परिसरातील टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्ट येथे ही आग लागली. उखिया पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. मरीन ड्राइव्हजवळील पटुआर्टेक बीच परिसरात असलेल्या या रिसॉर्टमध्ये आग लागल्यानंतर काही तासांनी अग्निशमन विभागाने 10 जणांचा मृत्यू झाल्याची आणि 9 जण जखमी झाल्याची माहिती दिली.

Bangladesh Cox's Bazar resort fire kills 10 people
21 BJP-RSS कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता; 12 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल, नेमकं काय घडलं?

बीडीन्यूज 24 च्या वृत्तानुसार, जखमी झालेल्या नऊ जणांना कॉक्स बाजार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींपैकी पाच जणांच्या शरीराचा सुमारे 5 टक्के भाग भाजला आहे. आगीमुळे भाजलेल्या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण रिसॉर्ट बांबू आणि लाकडापासून बाधण्यात आला होता. तीन मजली असलेली ही इमारत बीच टाउनच्या प्रवेशाद्वाराजवळ असून कोलाटोलीपासून सुमारे 29 किलोमीटर अंतरावर आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, आग लागली तेव्हा रिसॉर्टमध्ये सुमारे 30 लोक उपस्थित होते. त्यापैकी चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित लोकांची स्थिति आणि ते नेमके कुठे आहेत, याबाबत अजून माहिती मिळाली नाहीये.

Bangladesh Cox's Bazar resort fire kills 10 people
जनगणना ड्युटीच्या नियमांत बदल; सरकारी कर्मचारी, लिपिकांसह खासगी शिक्षकांनाही संधी

कॉक्स बाजार अग्निशमन विभागाचे उपसहाय्यक संचालक सैयद मोहम्मद मोर्शेद हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे. कॉक्स बाजारचे उपजिल्हाधिकारी ए. मन्नान यांनी सांगितले की, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यांचे डीएनए नमुने घेतले जाणार आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभागाकडून या घटनेचा तपास सुरू आहे. काहींच्या मते, रिसॉर्टच्या स्वयंपाकघरातून आग लागली असण्याची शक्यता आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com