21 BJP-RSS कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता; 12 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल, नेमकं काय घडलं?

Kerala Court Acquits 21 BJP-RSS Workers In Jainul Abid Killed Case: केरळमधील कासरगोड येथे 2014 मध्ये झालेल्या एसडीपीआय कार्यकर्ता जैनुल आबिद हत्या प्रकरणात न्यायालयाने 21 भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.
KERALA COURT ACQUITS 21 BJP-RSS WORKERS IN JAINUL ABID CASE
KERALA COURT ACQUITS 21 BJP-RSS WORKERS IN JAINUL ABID CASEsaam tv
Published On: 

केरळमधील कासरगोड येथील कोर्टाने 2014 मध्ये झालेल्या SDPI कार्यकर्ता जैनुल आबिद यांच्या हत्या प्रकरणात 21 भाजप आणि RSS च्या कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. शनिवारी (17 ऑक्टोबर) निकाल देताना कोर्टाने म्हटले की, आरोपीविरोधातील आरोप सिद्ध करण्यास समोरील पक्ष अपयशी ठरला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अचिंत्य राज उन्नी यांनी हा निर्णय दिला. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे स्थानिक नेते महेश के., उदयन, प्रशांत, प्रताप आणि हरीश बी. यांचाही समावेश आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 81 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच 20 पुरावे आणि 150 दस्तऐवजांचाही विचार करण्यात आला.

KERALA COURT ACQUITS 21 BJP-RSS WORKERS IN JAINUL ABID CASE
जनगणना ड्युटीच्या नियमांत बदल; सरकारी कर्मचारी, लिपिकांसह खासगी शिक्षकांनाही संधी

डिसेंबर 2014 मध्ये झाली होती हत्या

जैनुल आबिद यांची 22 डिसेंबर 2014 रोजी रात्री कासरगोड येथील जुन्या बसस्थानकाजवळ हत्या झाली होती. आबिद हा 24 वर्षांचा होता. तो तलंगारे कुन्निल परिसरातील रहिवासी आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चा समर्थक होता. घटनेच्या रात्री सुमारे 9.30 वाजता आबिद वडिलांना दुकान बंद करण्यासाठी मदत करत होता.

KERALA COURT ACQUITS 21 BJP-RSS WORKERS IN JAINUL ABID CASE
पालकांसाठी महत्त्वाची बातमी! भारतात लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येणार? VIDEO

दुकानात घुसून धारदार शस्त्र घेऊन काही जण दुकानात घुसले आणि त्यांनी आबिदवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यावेळी आबिद हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. हल्ल्यानंतर आबिदला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मंगळूर येथे हलवण्यात आले होते. मात्र 23 डिसेंबर 2014 रोजी त्याचा मृत्यू झाला.

KERALA COURT ACQUITS 21 BJP-RSS WORKERS IN JAINUL ABID CASE
Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

या हत्येनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरणात 21 BJP-RSS कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या खटल्याचा निकाल तब्बल 12 वर्षांनंतर लागला असून, आबिदच्या पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने कोर्टाने सर्व 21 आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com