
जगातील सध्याची युद्धस्थिती, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीने लोकांची झोप उडवली आहे. बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यतज्ज्ञ बाबा वेंगा या महिलेने आत्तापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. ती सगळी खरी ठरली आहेत. आता 7 जून 2025 रोजीसाठी बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीने अनेकांच्या पोटात गोळा आलाय.
काही एजन्सींचे अहवाल, अवकाश शास्त्रज्ञ, हवामान तज्ञांचे इशारे हे सर्व मोठ्या आपत्तीच्या दिशेने निर्देश करत आहेत. आणि ही दिशा वेंगा यांनी 2025 शी संबंधित केलेल्या भाकितांशी मिळतीजुळती असल्याचं दिसतं. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष देखील थांबत नाहीये. भारत आणि पाकिस्तानमध्येही दहशतवादी हल्ल्यामुळे तणाव आहे.
7 जून या तारखेमध्ये असं काय खास आहे ते पाहूया...
ज्योतिषींच्या मते 7 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आपली राशी बदलत आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह युद्ध,आक्रमकता, अपघात, जाळपोळ, रक्त यांचा कारक आहे. त्याच वेळी सिंह राशी नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचे प्रतीक आहे. जेव्हा मंगळ सिंह राशीत भ्रमण करतो तेव्हा असे मानले जाते की त्याचा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होऊ शकतो.
बाबा वांगा म्हणाले होते की 2025 नंतर जग वेगवेगळ्या मानसिकतेसह दोन संस्कृतींमध्ये विभागले जाईल. एक तंत्रज्ञानात बुडालेली असेल आणि दुसरी अध्यात्मात हरवलेली असेल. दक्षिण गोलार्धात अचानक एक मोठा स्फोट होईल. विषारी पदार्थ पाण्यात विरघळतील आणि नवीन रोग जन्माला येतील. जून 2025 नंतर विषाणू आणि बुरशी नवीन साथीचे रोग निर्माण करू शकतात.
वेंगा यांनी आणखी एक इशारा दिला होता.पूर्वेकडील एक देश आपल्या आध्यात्मिक शक्तीने पश्चिमेकडील आव्हानांना रोखण्याचा प्रयत्न करेल. हा देश भारत असल्याचं बोललं जातंय. कारण भारत शतकानुशतके अध्यात्माचे केंद्र राहिले आहे. जिथे योग, ध्यान आणि प्राचीन ज्ञानाची मुळे खोलवर रुजलेली आहेत.
अचूक भाकित करणारे बाबा वेंगा कोण होते? ते पाहूया...
बल्गेरियाचे वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांनी अगदी लहान वयातच त्यांची दृष्टी गमावली. परंतु असे म्हटले जाते की देवाने त्यांची पाहण्याची क्षमता हिरावून घेतली आणि भविष्य जाणून घेण्याची अद्वितीय क्षमता दिली. बाबा वेंगा एक अतिशय रहस्यमय महिला होती. तिने अनेक मोठ्या जागतिक घटनांचे भाकीत केले होते. यातील काही भाकिते इतकी अचूक होती की जगभरातील तज्ञ आणि शास्त्रज्ञही त्यांच्या दूरदृष्टीने थक्क झाले. बाबा वेंगा यांनी 1996 मध्ये या जगाचा निरोप घेतला.
आपण अनेकदा भाकिते फक्त एक किस्सा समजून दुर्लक्ष करतो. परंतु, बाबा वांगाच्या अचूकतेमुळे त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. त्यामुळे 7 जून आणि एकूणच 2025 या वर्षामध्ये जगात काय मोठं घडणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. मानसिकदृष्ट्याही त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.