बेगानी शादी में अब्दुला...; ठाकरे-पवार युतीच्या चर्चांवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

Maharashtra Politics : सध्या राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यहे दोन ठाकरे बंधू युतीमुळे एकत्र दिसतील. त्यामुळे दोन पक्षांतील युतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. पांडुरंगाची इच्छा असेल, तर बहीण-भाऊ (सुप्रिया सुळे-अजित पवार) आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ठाकरे आणि पवार यांच्यातील युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Maharashtra Politics
लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

'बेगानी शादी में अब्दुला दिवाना मी नाही. ते दोन पक्ष आहेत, ते दोन भाऊ आहेत, काका-पुतण्या आहेत. ते याबाबत निर्णय घेतील. त्या दोघांमध्ये काही संवाद आहे की नाही हे मला माहीत नाही. दोन्ही घराण्यावर बोलून, हात दाखवून मला अवलक्षण करायचं नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. संजय राऊत यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी 'संजय राऊत काय बोलतात हे मला कशाला विचारता? माझ्या पातळीचं राजकारण मला समजतं. खरं बोलता येतं. त्यावर मला विचारत जा', असे उत्तर दिले.

Maharashtra Politics
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

भारताचे इथॅनॉल मॅन, ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित 'पैलतीरावरून .... तर अस झालं' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा झटका, एकमेव नगरसेवक फोडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com