लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

Maharashtra Politics : भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे धाराशिवमधील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. तेव्हा सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसवला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य केले आहे. त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.
Nitesh Rane Devendra Fadnavis
Nitesh Rane Devendra Fadnavisx
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्याने शिवसेनेला इशारा दिला आहे. कुणी कितीही ताकद दाखवली तरीही देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे लक्षात ठेवा, असेही राणे यांनी वक्तव्य केले.

धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याला नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी अन्य पक्षांवर घणाघात केला. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून लक्ष घाततील असे नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला. 'कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरीही सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही,' असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

Nitesh Rane Devendra Fadnavis
Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार! हिंजवडी IT पार्कमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाण्यात अनेक दुचाकी बुडाल्या

भाजप आणि शिवसेना यांच्या धाराशिवमध्ये सुप्त संघर्ष आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन दोन्ही पक्षात संघर्ष असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे मंत्री असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे.

Nitesh Rane Devendra Fadnavis
५ दिवसांपूर्वी साखरपुडा, दुकानात आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा जागीच मृत्यू; CCTVमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com