Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार! हिंजवडी IT पार्कमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाण्यात अनेक दुचाकी बुडाल्या

Pune Rain Video : पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पाणी तुंबल्याने अनेक दुचाकी पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळाले.
Pune Rain Video
Pune Rain Videox
Published On

पुण्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता परत पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्क जलमय झाला. आयटी पार्क बस स्थानक पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक स्कूटर पाण्यात पूर्णपणे बुडाल्याचे दिसते. यावरुनच पाणी किती मोठ्या प्रमाणात साचले आहे हे लक्षात येते. त्यानंतर बस स्थानकाजवळ इतर वाहने देखील पाण्यात बुडल्या आहेत असे दिसते. रस्त्याच्या कडेला उभे राहून हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे.

Pune Rain Video
Mumbai Red Alert : मुंबईत रेड अलर्ट! पुढील ३-४ तास अत्यंत महत्वाचे, पाऊस घालणार धुमाकूळ

काही मिनिटांसाठी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडीत ठिकठिकाणी रस्ते पाण्याने तुंबले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही भागातील दुचाकी वाहने वाहून गेली. अनेक चारचाकी वाहनांमध्ये पाणी गेले. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हिंजवडीत ड्रेनेज लाईनचे काम न झाल्याने आणि नालेसफाईत दिरंगाई झाल्याने आयटी पार्कचे रुपांतर हिंजवडी वॉटर पार्कमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.

Pune Rain Video
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे तेथे रेड अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात देखील ठिकठिकाणी दमदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे.

Pune Rain Video
५ दिवसांपूर्वी साखरपुडा, दुकानात आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा जागीच मृत्यू; CCTVमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com