उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Uddhav Thackeray Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा हादरा बसला आहे. चांदिवली परिसरात ठाकरे गटातील ३० ते ४० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Uddhav Thackeray Shivsena UBT
Uddhav Thackeray Shivsena UBTx
Published On

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. मुंबईच्या चांदिवलीमध्ये तब्बल तीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राजीनामा दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदिवली परिसरात बीजेपी आणि इतर पक्षातून अनेकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने नव्या शाखा प्रमुखांची निवड केली. जुन्या शिवसैनिकांच्या जागी पक्षात नव्याने आलेल्यांना संधी देण्यात आली. यामुळे जुने कार्यकर्त, पदाधिकारी दुखावले गेल्याचे म्हटले जात आहे. यातूनच तीस-चाळीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.

Uddhav Thackeray Shivsena UBT
Mumbai Red Alert : मुंबईत रेड अलर्ट! पुढील ३-४ तास अत्यंत महत्वाचे, पाऊस घालणार धुमाकूळ

शिवसेना - मनसे युती

मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही युतीच्या चर्चांवर ठाम भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राऊत यांनी कौतुक देखील केले आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत काल सूचक विधान केले होते.

Uddhav Thackeray Shivsena UBT
५ दिवसांपूर्वी साखरपुडा, दुकानात आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा जागीच मृत्यू; CCTVमध्ये घटना कैद

उद्धव ठाकरे यांना काल एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा 'जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल', असे उद्धव ठाकरे म्हणाले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षातील नेते युतीवर प्रतिक्रिया देत आहेत. आज घराबाहेर पडताना 'मातोश्रीवर चाललोय' असे म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतली.

Uddhav Thackeray Shivsena UBT
आदित्य ठाकरे पावसाळ्यात जेलमध्ये जाऊ शकतात; नितेश राणेंचं खळबळजनक विधान, राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचीही खिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com