Mumbai Red Alert : मुंबईत रेड अलर्ट! पुढील ३-४ तास अत्यंत महत्वाचे, पाऊस घालणार धुमाकूळ

Mumbai Weather Update : राज्यात पावसाने थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एन्ट्री घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Red Alert
Mumbai Red Alertx
Published On

Mumbai Rain Red Alert : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यातही दक्षिण मुंबईमध्ये दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतदेखील पाऊस सुरु झाला आहे.

पुण्यातही पाऊस

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात दमदार पाऊस झाला. काही मिनिटांसाठी झालेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्त्यांनी नद्यांचे स्वरुप घेतले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकीदरम्यान अडचणी यायला सुरुवात झाली. अनेक दुचाकी वाहने पाण्यात वाहून गेली. हिंजवडीमध्ये नालेसफाई आणि ड्रेनेज लाईन यांची व्यवस्था न केल्याने आयटी पार्कला वॉटर पार्कचे स्वरुप आले.

Mumbai Red Alert
Hinjewadi: पिंपरी, हिंजवडीत पावसाचा धुमाकूळ; बाईक, कार अर्ध्या बुडाल्या | VIDEO

कोकणात पावसाला सुरुवात

सहा दिवसांच्‍या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्‍हयात पुन्‍हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली, म्‍हसळा, श्रीवर्धन, मुरूड भागात दुपारी मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस बरसायला सुरूवात झाली. काही भागात ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू आहे. सकाळी कडक ऊन पडले होते मात्र दुपारी आकाशात काळेकुटट ढग जमा झाले आणि पावसाने बरसायला सुरूवात केली.

Mumbai Red Alert
बापरे! कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली | VIDEO

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पाऊस बसरणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान खात्याद्वारे देण्यात आले आहेत.

Mumbai Red Alert
५ दिवसांपूर्वी साखरपुडा, दुकानात आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा जागीच मृत्यू; CCTVमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com