Pune : बसने धडक दिली अन् बाईक फरपटत गेली, हॉटेलवरुन परतताना दीर-वहिनीचा अपघात; वहिनीचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर एका भरधाव वेगाने जात असलेल्या बसने बाईकला जोरदार धडक मारली. यामुळे बाईक फरपटत गेली. बाईकवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर बाईकस्वाराला गंभीर जखमा झाल्या.
Pune Accident
Pune Accidentx
Published On

पुणे-नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका बसने बाईकला धडक मारली. या धडकेत बाईकवर बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात रात्री अकराच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एकजण जखमी झाल्याचेही म्हटले जात आहे. सदर घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे गावच्या हद्दीतील कळंब बायपास चौकात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रुपाली पडवळ असे आहे. तर जखमीचे नाव अक्षय हनुमंत पडवळ असे आहे. महाळुंगे पडवळ येथील हॉटेल माऊली येथे जेवण करुन दोघे घरी परतत होते. एकलहरे गावच्या हद्दीत त्यांच्या बाईकने प्रवेश केला. ते कळंबच्या दिशेने जात होते. तेव्हा पुण्याहून एक बस वेगाने आली. बसने बाईकला पाठीमागून धडक मारली.

Pune Accident
Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार! हिंजवडी IT पार्कमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाण्यात अनेक दुचाकी बुडाल्या

धडकीमळे बाईक फरपटत गेली. रुपाली आणि अक्षय बाईकवरुन पडले. बाईकवर मागच्या बाजूला बसलेल्या रुपालीला गंभीर जखमा झाला. अपघातात तिचा मृत्यू झाला. बाईक चालवणारा अक्षय पडवळ देखील जखमी झाला. अपघात झाल्यानंतर बस चालक तेथून फरार झाला. जखमींना मदत करण्याऐवजी बस चालक पळून गेला.

Pune Accident
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

प्रणित पडवळ यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर बस चालकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी बस चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर कळंब बायपास येथून सुरु होणाऱ्या अरुंद रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. येथे काही उपाय करावेत अशी मागणी होत आहे.

Pune Accident
५ दिवसांपूर्वी साखरपुडा, दुकानात आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा जागीच मृत्यू; CCTVमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com