Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Ayodhya Ram Temple : अयोध्या ट्रस्टमध्ये चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता बँक खात्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमेत मोठा फरक पाहायला मिळतोय. या आधारावरून ट्रस्टमध्ये बऱ्याच काळापासून दररोज लाखो रुपयांची चोरी होत होती.
Ayodhya Ram Temple
saam tv
Published On
Summary
  • एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू

  • बँक खात्यांतील व्यवहार आणि दानरकमेची नोंद तपासली जात आहे.

  • अयोध्या राम मंदिरातील दानरक्कम जमा होण्यात तफावत

Ayodhya Ram Temple
Ram Temple in Dhule: धुळ्यात अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; धुळेकरांकडून अयोध्येचा अनुभव घेण्यासाठी हजारोंची गर्दी

अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचं प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अयोध्या ट्रस्टमध्ये चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता बँक खात्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमेत मोठा फरक पाहायला मिळतोय. याच आधारावर एसआयटीला संशय आहे की, ट्रस्टमध्ये बऱ्याच काळापासून दररोज लाखो रुपयांची चोरी होत होती. दररोज ६ ते ८ लाख रुपयांची चोरी होत होती असा संशय पोलिसांना आहे.

Ayodhya Ram Temple
Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

तपास यंत्रणेने आता या संपूर्ण प्रकरणात बँक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. तपास यंत्रणेने अनेक महत्त्वाचे कागदपत्रदेखील आपल्या ताब्यात घेतलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचं प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी ट्रस्टच्या एसबीआय (SBI) आणि पीएनबी (PNB) बँक खात्यांमध्ये दररोज १६ ते १८ लाख रुपये जमा केली जात होती. परंतु चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर बॅकेत जमा होणाऱ्या रक्कमेत वाढ झाली आहे. आता दररोज जमा होणारी रकम २४ ते २६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दररोज व्हायची ६ ते ८ लाखांची चोरी

एवढी मोठी वाढ पाहून एसआयटी देखील हैराण झाली आहे. आधी दररोज सुमारे ६ ते ८ लाख रुपयांची चोरी केली जात असावी, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. एसआयटीने या संपूर्ण आर्थिक फरकाला आपल्या तपासाचा मुख्य भाग बनवलंय. हा पैसा नेमका कुठे जात होता आणि यामध्ये कोण-कोणते लोक सहभागी आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता अधिकारी करत आहेत. याच संदर्भात एसआयटीने एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकासह एकूण १० बँक कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे.

Ayodhya Ram Temple
Ram Temple Inauguration: सायबर ठगांकडून रामभक्त टार्गेट; करताहेत ऑनलाइन फसवणूक, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलं सावध

मोठे खुलासे होण्याची शक्यता

चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांनी बँकेशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रं आणि व्यवहारांचा संपूर्ण हिशोब आपल्या ताब्यात घेतला आहे. आता या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जातेय. जेणेकरून नेमकी कुठे गडबड झाली आणि कोणाच्या संगनमताने हे सर्व सुरू होतं, हे स्पष्ट होऊ शकेल. आतापर्यंतच्या तपासात दोन ते तीन लोकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com