

राम मंदिराने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी भरती जाहीर
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांसाठी करण्यात येणार
राम मंदिरातील चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता अयोध्या येथील राम मंदिर चर्चेत आलंय. चोरी प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्यात आलीय. तर याप्रकरणाचा पुढील तपास अजून केला जातोय. दरम्यान आता मंदिर प्रशासनात मोठे फेरबदल केला जातोय. यापार्श्वभूमीवर राम मंदिरातील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या नियुक्तीबाबत सोमवारी अधिसूचना जारी करण्यात आलीय. या महत्त्वाच्या पदावरील नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. समाधानकारक कामगिरीच्या आधारे ती मुदत वाढवली जाणार आहे.
५० ते ७० वयोगटातील कोणताही पदवीधर अर्ज करण्यास पात्र आहे. अर्जदार हिंदू आणि प्रभू श्रीरामाचा भक्त (वैष्णव) असणे ही मुख्य अट आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ जुलै आहे. राम मंदिरात देणगीची चोरी झाल्याचे लक्षात येताच तेथील प्रशासकीय व्यवस्था बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली. ६ जुलै रोजी झालेल्या 'श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या बैठकीत या बदलाला अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली.
ट्रस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (CEO) अयोध्येत वास्तव्य करणे अनिवार्य असणार आहे. या पदासाठी किमान पात्रता पदवी (बॅचलर डिग्री) आहे. त्याच्याकडे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे वेतन अद्याप निश्चित केलेले नाही. त्यांचे मानधन आणि भत्ते वाटाघाटीद्वारे ठरवले जाणार आहे.
राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे २० वर्षांचा व्यवस्थापकीय अनुभव असावा. सार्वजनिक संस्था, विभाग, संघटना किंवा कंपनीमध्ये किमान २० वर्षे व्यवस्थापकीय पदांवर काम केलेल्या व्यक्तींची राम मंदिराच्या सीईओपदी नियुक्ती केली जाईल.
उमेदवाराकडे सामान्य प्रशासन, वित्त, लेखा, कर्मचारी व्यवस्थापन, जनसंपर्क, माहिती तंत्रज्ञान (IT), सुरक्षा आणि कायदेशीर बाबी यांसारख्या क्षेत्रांमधील अनुभव हवा. हिंदू मंदिराच्या व्यवस्थापनाचा पूर्व अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. आवश्यक पात्रता असलेले निवृत्त अधिकारीही अर्ज करू शकतात.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे (CEO) विविध जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. ते ट्रस्टच्या सरचिटणीसांना जबाबदार असतील. त्यांना सर्व प्रकारची वैधानिक, प्रशासकीय आणि आर्थिक कामे हाताळावी लागतील. राम मंदिराची ख्याती लक्षात घेत, त्याची व्याप्ती आणि स्वरूपानुसार साजेशी अशी कार्यप्रणाली विकसित करणे, त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक यंत्रणा व कार्यपद्धती प्रस्थापित करणे.
व्हीआयपी (VIPs) व्यक्तींसाठी सुरक्षा व्यवस्था व कार्यपद्धतींचे नियोजन करणे . राम मंदिराशी संबंधित अधिकारी, सेवक (स्वयंसेवक) आणि कर्मचारी यांच्यावर देखरेख ठेवणारे प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत राहून चालू उपक्रम व आगामी विकास प्रकल्प यांचे कामकाज कार्यक्षमतेने पार पाडणे. तसेच ट्रस्टची वैधानिक व नियामक चौकट आणि ट्रस्ट डीडमधील तरतुदींनुसार विविध कामे पूर्ण केली जातील याची सुनिश्चिती करणे.
राम मंदिरासाठी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे. स्थानिक, राज्य व केंद्र सरकारशी समन्वय राखणे. भाविकांची सुरक्षा, सोय आणि समाधान यांना प्राधान्य दिले जाणे गरजेचे आहे. तसेच, भेट देणारे अतिमहत्त्वाचे व्यक्ती (VIPs) आणि प्रतिष्ठित संत यांच्यासाठीही योग्य व्यवस्था करावी लागेल. येथील मालमत्तेचे रक्षण करणे आणि नियमांनुसार गुंतवणूक करणे. ट्रस्ट डीडमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सरचिटणीसांच्या सूचनांनुसार इतर जबाबदाऱ्याही पार पाडणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.