High Court: स्तनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नव्हे; कोलकाता उच्च न्यायालय

Calcutta High Court: कोलकाता उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय.
High Court
Calcutta High Court
Published On

बलात्कार खटल्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. सत्र न्यायालायने एका व्यक्तीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. परंतु उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केलाय. आरोपीला दोषी ठरवण्याच्या आणि शिक्षेच्या पूर्वीच्या आदेशाला स्थगिती देत ​​न्यायालयाने म्हटलं की, पीडितेच्या स्तानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केवळ POCSO कायद्यांतर्गत विनयभंग म्हणता येईल,पण त्याला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणता येणार नाही.

High Court
High Court News : महिला बलात्कार करू शकत नाही, तरीही...; बलात्कार प्रकरणी हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

कनिष्ठ न्यायालयाने सुनावली होती १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला शारिरिक शोषण आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यात आरोपीला १२ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायमूर्ती अरिजीत बॅनर्जी आणि बिस्वरूरप चौधरी यांच्या खंडपीठाने म्हटलं की, पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्काराचा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाहीये. त्याआधारे न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती आणलीय.

आरोपीने दारूच्या नशेत केला पीडितेच्या स्तनाला स्पर्श

पीडितेच्या जबाबानुसार,आरोपीने दारूच्या नशेत पीडितेच्या स्तनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाने म्हटलं की, जर अंतिम सुनावणीनंतर आरोप फक्त गंभीर लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं, तर दोषीची शिक्षा देखील १२ वर्षांवरून पाच ते सात वर्षांपर्यंत कमी केली जाईल. या विशिष्ट प्रकरणात, दोषीने आधीच २८ महिने तुरुंगवास भोगलाय.

याचिकेवर सुनावणी होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, दोषी ठरवणारे आणि शिक्षेच्या आदेश स्थगित राहतील, असा आदेश खंडपीठाने दिला. तसेच याचिकेवरील सुनवाणी संपेपर्यंत दंड देखील भरण्यास मनाई केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com