
High Court News Update : 'महिला स्वत: बलात्कार करु शकत नाही, पण त्या बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करु शकत असल्यास त्यांना शिक्षा होईल' असे वक्तव्य मध्यप्रदेश हायकोर्टाने केला आहे. एका गंभीर प्रकरणात निकाल देताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रमोद कुमार अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने आरोपीच्या आई आणि भावाला दोषी ठरवले आहे. कोर्टाने दोघांवर कलम 376 r/w 34, 109 और 506-11 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
२१ ऑगस्ट २०२२ रोजी पीडित महिलेने भोपाळच्या छोला मंदिर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केली. अभिषेक गुप्ता या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. यात आरोपीची आई आणि भाऊ देखील दोषी असल्याचे पीडितेने म्हटले होते. ८ जुलै २०२१ रोजी आरोपीने पहिल्यांदा पीडितेला घरी बोलवून तिच्यावर जबरदस्ती केली. साखरपुडा झाल्यानंतर अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचे पीडित महिलेने म्हटले.
आरोपीच्या आईने या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते. तिने लग्नाच्या आधी शरीरसंबंध ठेवणे सामान्य बाब असल्याचे तिने म्हटले होते. यावरुन न्यायालयाने आरोपीची आई आणि भाऊ देखील या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहेत असे म्हटले होते. भोपाळ सेशन कोर्टाने या प्रकरणी आरोपी अभिषेक गुप्ताला दोषी ठरवले होते. त्यासोबत आई-भावाला देखील आरोपात भागीदार असल्याचे म्हटले होते. या निकालावरुन आरोपी आणि त्याच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.
सेशन कोर्टाच्या निकालावर मध्यप्रदेश हायकोर्टाने संमती दर्शवली. यासोबतच हायकोर्टाने आरोपीची आई आणि भावाने बलात्काराच्या घटनेला सहमती दर्शवत त्याला प्रोत्साहन दिल्याचे मान्य केले. त्यांच्यावर कलम 376 r/w 34, 109 और 506-11 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय बलात्काराच्या प्रकरणांमध्ये नवा कायदेशीर दृष्टीकोन मांडतो, असे पीडितेच्या वकीलांनी म्हटले आहे. याशिवाय जर कोणी महिला बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तिला देखील शिक्षा होईल असा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.