Operation Sindoor: मध्यरात्री 1.20 वाजता हल्ला, अजित डोभाल यांचा फोन आणि...; पाहा कसं केलं ऑपरेशन सिंदूरचं पूर्ण प्लॅनिंग?

Timeline Of Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून आज मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
Timeline Of Operation Sindoor
Timeline Of Operation SindoorSAAM TV
Published On

अखेर पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतलचा. ७ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या आसपास भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानात लपलेल्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येतेय. हा हल्ला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या लपण्याच्या ठिकाणांवर करण्यात आला आहे.

भारताने 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केल्याची माहिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकवर झालेल्या हल्ल्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी पत्रक जारी करत माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत, ऑपरेशन सिंदूरची योजना कशी आखण्यात आली. त्याचप्रमाणे या हल्ल्याचा घटनाक्रम कसा होता ते जाणून घेऊया.

Timeline Of Operation Sindoor
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच, पाकिस्तानात १०० किमीपर्यंत हल्ला; ती ९ ठिकाणं कोणती?

एअर स्ट्राईकचा घटनाक्रम कसा होता?

  • मध्यरात्री 1.20 वाजता- भारताकडून पाकिस्तानमधील दहशतवादी जागांवर हल्ला करण्यात आला.

  • मध्यरात्री 1.50 वाजता - या घटनेची माहिती भारतीय सेनेकडून देण्यात आली. संरक्षण मंत्रालयानेही यासंदर्भातील पत्रक जाहीर केलं.

  • मध्यरात्री 2.46 वाजता- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून या घटनेला दुजोरा देण्यात आला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.

  • मध्यरात्री 3 वाजता - On the Line of Actual Control वर पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरुवात करण्यात आली.

  • पहाटे 3.03 वाजता - पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याकडून भारताने हल्ला केल्याची माहिती दिली गेली. यावेळी त्यांनी ट्विट केलं.

  • पहाटे 3.15 वाजता - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनेचा सविस्तर क्रम त्यांना सांगितला.

  • पहाटे 3.20 वाजता - लाहोर, सियालकोट विमानतळं बंद करण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानने केली.

Timeline Of Operation Sindoor
Operation Sindoor: पाकिस्तानची नजर मॉक ड्रिलवर; भारताने रात्री दीड वाजता केला एअर स्ट्राईक, जाणून घ्या सर्व माहिती

कसं केलं गेलं ऑपरेशन सिंदूरचं प्लॅनिंग?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ऑपरेशन सिंदूरचं प्लॅनिंग सुरू करण्यात आलं होतं. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व सोपवलं होतं. ते सतत हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते.

Timeline Of Operation Sindoor
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर 'असे' पडले मिसाईल्स! भारताच्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल

पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुप्तचर संस्था आणि एनटीआरओसह पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची ओळख पटवण्याची जबाबदारी अजित डोभाल यांना देण्यात आली होती. देखरेखीनंतर अशी एकूण 9 ठिकाणं निश्चित करण्यात आली. एनएसए अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एक छोटी टीम तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये तिन्ही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com