या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांना लोकसभेची सेमीफायनल म्हटलं जात आहे. शिवाय मतदानाचा एक्झिट पोलदेखील निकाल त्याचप्रमाणे लागलेत. दोन्ही तिन्ही ठिकाणी भाजप आणि काँग्रेससाठी ५०-५० टक्के विजयाची संधी आहे. त्यामुळे अपक्ष नेत्यांची भाव वाढताना दिसत आहे. उद्या तीन डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
मतमोजणीची वेळ जवळ येऊ लागलीय तसं उमेदवारांचं टेन्शन वाढू लागलंय. उमेदवारांचं आणि राज्यातील नागरिकांच्या नशीब पालटणारी मतमोजणी नेमकी होते तरी कशी? काय असतात मतमोजणीचे नियम असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याची माहिती आपण जाणून घेऊ ...
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आधी बॅलेट पेपर असल्याने वेळ लागत होता, आता तर ईव्हीएम आल्याने मतमोजणी सोपी झाली असेल असं अनेकांना वाटत असेल परंतु तसं नाहीये. यासाठी अनेक नियम ठेवण्यात आली आहेत. तर मतमोजणी करण्यासाठी भल्ला पहाटेपासून लगबग सुरू होते.
पहाटे पाच वाजेपासून सुरू होते प्रक्रिया
सूर्यही झोपलेला अवस्थेत असतो, तेव्हापासून मतमोजणी केंद्रांवर हालचाली सुरू असतात. या केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते रात्रीपासून पहारा देत बसलेले असतात. तर पहाटे पाचच्या सुमारास कायदेशीर कारवाई सुरू होते. मतमोजणी ८ वाजेनंतर सुरू होत असली तरी त्यापूर्वीच सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी निरीक्षक आणि सहाय्यक पहाटे ५ वाजता तेथे पोहोचत असतात.
त्यांना त्यांच्या रिपोर्टिंग अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागते. येथे त्यांना सर्व सूचना दिल्या जातात. जर पोलिसांना काही शंका असल्यास त्याचे निरसनही केले जाते. विशेष म्हणजे त्यांची ड्युटी कुठे असेल याची माहिती सुद्धा त्यांना आधी दिली जात नाही. मतमोजणी सुरू होणार असते त्याची काही वेळापूर्वी ते कुठे ड्युटी करतील हे सांगितले. या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रिक गॅजेट नेता येत नाहीत.
कसा आणि किती वाजता येतो पहिला निकाल
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होते. दरम्यान काही विशेष कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे वेळ बदलली जाऊ शकते. आधी बॅलेट पेपर आणि ईटीपीबीएस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे टाकलेली मते मोजली जातात. याला सरासरी अर्धा तास लागतो. त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होते.
येथे एक रिटर्निंग ऑफिसर एक-एक फेरी झाल्यानंतर निकाल सांगण्यास सुरूवात करतो. त्याचबरोबर सभागृहात असलेल्या फलकावरही तो निकाल लिहिला जातो. यासोबतच निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही हा डेटा अपलोड करण्यात येतो. साधारणपणे सकाळी ९ च्या सुमारास पहिला निकाल लागतो. दरम्यान ही सत्र दिवसभर सुरू राहत आणि दुपारपर्यंतनंतर परिस्थिती काही प्रमाणात सुरळीत होऊ लागते.
EVM आणि VVPAT च्या पावत्या मोजल्या जातात
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निरीक्षक आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्यावर स्वाक्षरी करतील. यानंतर रिटर्निंग अधिकारी प्रति स्वाक्षरी करत असतो. त्यानंतर घोषणा केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी केली जाईल. यानंतर अनिवार्य VVPAT पडताळणी केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच किंवा त्याहून अधिक निश्चित ईव्हीएमसाठी VVPAT पावतींची मोजणी केली जाईल. व्हीव्हीपीएटीने ईव्हीएमच्या मोजणीत फरक आढळल्यास परत मोजणी केली जाते. यानंतरही दोन आकडे जुळत नसल्यास VVPAT पावतींची मोजणी केली वैध मजली जाते.
मतमोजणी हॉलमध्ये कोण राहू शकतो?
एवढ्या मोठ्या मतदारसंघाची मतमोजणी केली जात असेल तर यावेळी अनेक अधिकारी तेथे उपस्थित राहत असतील असं वाटतं असेल. परंतु मतमोजणीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराचा एक एजंट सर्व उपस्थित असतो. विशेष परिस्थिती वगळता एका केंद्रात १४ पेक्षा जास्त टेबल्स बसवता येत नाहीत. उमेदवाराचा एजंट रिटर्निंग ऑफिसर (RO) च्या शेजारील टेबलवर बसतो.
अशाप्रकारे केवळ मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवारांचे एजंट आणि आरओ सभागृहात राहू शकतात. पोलिसांनाही सभागृहात जाण्यास मनाई आहे. पण जर रिटर्निंग ऑफिसरने त्यांना काही विशेष कारणासाठी बोलावले तर ते जाऊ शकतात. केवळ मोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक, मतमोजणीसाठी तैनात केलेले सरकारी कर्मचारी, निवडणूक आयोगाने तैनात केलेले अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी केंद्रात जाऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे आयोग आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र नसेल तर हे लोकही केंद्रात जाऊ शकत नाहीत.
मतमोजणी मान्य नसेल तर
मतदानाच्या मतमोजणीवर एखादा उमेदवार समाधानी नसेल, तर तो मतमोजणीच्या ४५ दिवसांच्या आत फेरमतमोजणी करण्याची मागणी करू शकतो. फेरमोजणीची मागणी करणाऱ्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्यापेक्षा सहापट जास्त मतं असणं बंधनकारक आहे. त्या भागातील जिल्हा दंडाधिकारी मतांच्या पुनर्गणनेसाठी परवानगी देऊ शकतात. निवडणुकीच्या वेळी कोणत्याही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्या भागाचे निवडणूक अधिकारी असतात. केवळ त्यांनाच मतांच्या फेरमोजणीचे आदेश देण्याचा अधिकार असतो.
निकाल जाहीर झाल्यानंतर EVM चे काय होतं?
निकाल जाहीर झाल्यानंतर आणि विजयी उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्र रिटर्निंग ऑफिसरने दिल्यानंतर, ईव्हीएम पुन्हा स्ट्राँग रूममध्ये ठेवले जाते. मतमोजणीनंतर तब्बल ४५ दिवसांसाठी ईव्हीएम एका स्टोअर रूममध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर ते तेथून मोठ्या स्टोअर रूममध्ये शिफ्ट केले जातात. निवडणूक आयोगानुसार या ईव्हीएममध्ये ६ महिन्यांपर्यंत डेटा जपला जातो. त्या मशीन्स दुसऱ्या निवडणुकींतील मतदानासाठी वापरले जात नाहीत. त्यातील डेटा दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे दडपल्यानंतर हे ईव्हीएम पुन्हा दुसऱ्या निवडणुकीतील मतदानासाठी वापरले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.