अजित पवारांनी काय गौप्यस्फोट केला आणि कोणी काय प्रयत्न केले, हे पाहण्यासाठी मी तिथे नव्हतो. त्यामुळे याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा राजीनामा आणि पुन्हा वापस घ्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या विषयावर बोलण्यास बावनकुळे यांनी स्पष्ट नकार देत हा विषय आपल्याशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे
देशात भाजप नंबर एकचा पक्ष असून पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये देखील आघाडीवरच असेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाचे अंदाज समोर आले असले आणि भाजप पिछाडीवर असल्याचं दिसत असलं तरी, प्रत्यक्षात आपल्याला ही तीन डिसेंबरच्या निवडणूक निकालानंतरही दिसून येईल की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष झालाय, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान फसल योजना ही फसवणारी योजना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान फसल योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यांनाच विचारायला पाहिजे या योजनेचा फायदा होतो की, नाही. एक रुपयात पिक विमा भरून पीक नुकसानीची भरपाई पंतप्रधानांच्या योजनेमध्ये आहे. या योजनेचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे त्यांनाच विचारा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)
छत्रपती संभाजीनगर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होत आहे सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संघटन मजबूत करत आहे. छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेची जागा पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे. आता याच जागेवर शिवसेना शिंदे गट देखील दावा करत आहे, असं असताना भाजपकडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जात आहे.
यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजी नगरची लोकसभेची जागा कोणाला सुटली तरी, प्रत्येक मतदार संघात भाजप 51 टक्के मत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. प्रत्येक लोकसभा मतदार संघात भाजपचे 600 वॉरियर्स तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.