Telangana Assembly Election-2023
Telangana Assembly Election-2023Saam Digital

Telangana Assembly Election-2023: विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधी वातावरण तापलं... डी. के. शिवकुमार यांनी केसीआर यांच्यावर केला गंभीर आरोप

Telangana Assembly Election-2023: तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी कॉंग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांनी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराशी संपर्क साधल्याचा आरोप केला आहे.
Published on

Telangana Assembly Election-2023

तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहेत. मात्र मतपोजणीपूर्वीच राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी काँग्रेस ने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांनी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराशी संपर्क साधल्याचा आरोप केला आहे. निकालाला काही तास बाकी आहेत मात्र, बहुमताचा आकडा काँग्रेसला गाठता आला नाही तर अशा परिस्थिती आमदारांना रिसॉर्टवर हलवण्याची शक्यता आहे.

आमदारांना बेंगळुरूमध्ये आणलं जात आहे का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डी. के शिवकुमार म्हणाले, आमचे आमदार आमच्या सोबत राहतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमदारांनी आम्हाला आधीच सांगितलं आहे की त्यांच्याशी कोण संपर्क करत आहे. माझ्या पक्षाच काम असल्यामुळे मी तेलंगणात जात आहे. कर्नाटक निवडणुकीदरम्यान तेलंगणातील काँग्रेस नेत्यांची सर्व टीम कर्नाटकमध्ये होती. त्यामुळे आम्ही तेलंगणात जात आहोत. सध्या निकालावर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्ष किंवा आमदारासंदर्भात कोणतीही अडचण नाही. कोणताही धोका नाही. काँग्रेसला या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळेल. आमच्या आमदारांना अडकण्याचा प्रयत्न केला जात आहे, याची माहिती मिळाली आहे. आमच्या आमदारांसोबत स्वत: मुख्यमंत्री केसीआर संपर्क करत असल्याचा आरोप यावेळी शिवकुमार यांनी केला.

Telangana Assembly Election-2023
Mizoram Election Result Date: मिझोराम विधानसभा निवडणूक निकालाची तारीख बदलली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण

नुकचाच जाहीर झालेल्या एक्झिट पोलबाबत नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर रिसॉर्टचे राजकारणही सुरू झाले आहे. डी. के. शिवकुमार शुक्रवारीच म्हणाल होते की, पक्षाच्या हायकमांडने आदेश दिले तर पाचही राज्यातील आमदारांना हाताळण्यास तयार आहे. ३० नोव्हेबरला तेलंगणात मतदान झाले होते, तर ३ डिसेंबरला निकाल आहे.

Telangana Assembly Election-2023
Telangana Assembly Election-2023: विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधी वातावरण तापलं... डी. के. शिवकुमार यांनी केसीआर यांच्यावर केला गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com