Madhya Pradesh EXIT POLL: मध्य प्रदेशमध्ये BJP आणि Congress मध्ये चुरस का वाढली? दोन्ही पक्षांना सत्ता मिळणं का झालं अवघड?

Madhya Pradesh EXIT POLL : मध्य प्रदेशच्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. पोलस्ट्रॅटने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्नभंग झाल्याचं दिसत आहे.
Madhya Pradesh EXIT POLL
Madhya Pradesh EXIT POLLSaam Tv
Published On

Madhya Pradesh Assembly Election Exit Poll:

मध्य प्रदेशच्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. पोलस्ट्रॅटने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे. मात्र राज्यातील महिलांनी भाजपवर विश्वास दाखवलेला दिसत आहे. तर पुरुष मतदारांनी काँग्रेसला पसंती दिलीय.(Latest News)

लाडली बहनाने दाखवली कमाल

एक्झिट पोलच्या निकालानंतर शिवराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी लाडली बहना योजनेचा उल्लेख केला. दरम्यान पोलमध्येही महिला मतदारांनी भाजपला पसंती दिल्याचं दिसत आहे. लाडली योजनेविषयी बोलताना शिवराज सिंह म्हणाले, निवडणुकीच्या काळात चुरशीची लढत असल्याचे बोलले जात होते, मात्र मेरी लाडली बहना या योजनेने अडचणी दूर झाल्या. निवडणुकीच्या काळात मी जिथे-जिथे सभांना जायचो, तिथे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असायची. त्यावेळ त्या भेटत आणि सांगत लाडली बहना योजनेचा त्यांना फायदा झाला. त्यांच्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार.

आज पाच राज्यातील विधानसभा निडणुकाचा एक्झिट पोल म्हणजेच सर्व्हे जाहीर झालाय. या सर्व्हेनुसार भाजपाच्या हाती निराशा लागण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाजप सत्तेपासून दूर जरी राहताना दिसत असला तरी काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांमधील तफावत खूप कमी आहे. राज्यातील भाजपची कामगिरी चांगली राहिली असून भारतीय जनता पक्षाला महिला मतदारांनी पाठिंबा दिलाय. राज्यातील मतदारांनी भाजपच्या खात्यात १०० पेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. परंतु राज्यातील पुरूषांनी काँग्रेसवर विश्वास दर्शवला तर महिला मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवलाय.

काय म्हणाले शिवराज सिंह

एक्झिट पोलचा निकाल समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण सत्तेत येऊ आणि पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकू असा आपल्याला आधीपासून विश्वास होता, असे ते म्हणाले. "मी नेहमी म्हणत आलो की मध्य प्रदेशात कोणतीही स्पर्धा नाही आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. हे पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे नेतृत्व, आमच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि योजना यावरून स्पष्ट होते.

कोणाकडे गेले तरूण

तरुणांनी कोणला मतदान केलं हेही एक्झिट पोलच्या सर्वेक्षणातून समोर आलंय. २३ वर्षांखालील मतदारांनी भाजपपेक्षा काँग्रेसवर अधिक विश्वास व्यक्त केला. या वयोगटातील ४५ टक्के मतदारांनी काँग्रेसला तर ४२ टक्के मतदारांनी भाजपला मते दिली आहेत. इतरांना १३ टक्के मते तरुण मतदारांनी दिली आहेत. युवा मतदारांवर नजर टाकली तर २३ ते ३५ वयोगटातील ४६ टक्के मतदारांनी काँग्रेसला मतदान केले तर ४३ टक्के मते भाजपला गेली.

मध्यमवयीन मतदार कोणाकडे गेले

मध्यमवयीन लोकांनी दोन्ही पक्षांना केलेल्या समान मतदानामुळे येथील निवडणूक चुरशीची झालीय. साधरण ३६ ते ४५ वयोगटातील मतदारांनी काँग्रेस आणि भाजपला जवळपास समान मतदान केले. ४६ टक्के मतदारांनी काँग्रेसला तर ४५ टक्के मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत त्यांना मतदान केले. मध्यमवयीन मतदारांनी काँग्रेसपेक्षा भाजपवर अधिक विश्वास व्यक्त केल्याच सर्व्हेतून दिसून येत आहे. ४६ ते ५५ वयोगटातील मतदारांपैकी ४७ टक्के लोकांनी भाजपला तर ४३ टक्के लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. सर्वेक्षणात भाजपला १०६ ते ११६ तर काँग्रेसला १११ ते १२१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Madhya Pradesh EXIT POLL
MP Assembly Election Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता, काँग्रेस की भाजप? काय आहेत एक्झिट पोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com