मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये आज मतदान पार पडलं. दोन्ही राज्यातील मतदारांनी मोठा प्रतिसाद देत मतदानाचा अधिकार बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशात ७१.११ टक्के मतदान झाले. तर छत्तीसगगडमध्ये ६७ टक्के मतदान पार पडलं. छत्तीसगडमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं.
मतदारांच्या उत्तम प्रतिसादावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. लोक मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावला. जे घरी आहेत होते त्यांनी मतदान करायला जावे असं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वत्र एकतर्फी वातावरण असून लोकांचा काँग्रेसवर विश्वास असल्याचं बघेल म्हणाले.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट परीक्षा असणार आहे. मध्यप्रदेशातील मतदारांनी काँग्रेस आणि भाजपचं शासन पाहिलं आहे. दोन्ही पक्षातील मुख्यमंत्र्यांचा कारभार सर्व लोकांनी बघितला असून मतदार दोघांपैकी कोणत्या पक्षाच्या हातात सत्ता देणार हे काही दिवसात समोर येणार आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
भाजपच्या केंद्रीय मंत्री आणि ४ खासदारांचं राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील मतदारांनी मतदानाला दिलेल्या मतदानावर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात चांगले मतदान होत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीचा सण आहे. सर्वांनी पुढे येऊन मतदानात सहभागी झाले पाहिजे, प्रज्ञा ठाकूर यावेळी म्हणाल्या.
मध्य प्रदेशातील विधानसभेच्या सर्व २३० जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील ७१.१६ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यातील निवडणूक लढवणाऱ्या सर्व २५३४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. आता ३ डिसेंबरला जनतेने कोणाला निवडले हे कळेल.
दरम्यान मध्य प्रदेशातील आगर माळव्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतांची टक्केवारी अलीराजपूर येथील आहे. येथे ५६.२४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय भोपाळमध्ये ५९.१९ टक्के इंदूरमध्ये ६४.९५ टक्के ग्वाल्हेरमध्ये ६१.६४ टक्के, जबलपूरमध्ये ६६.२४ टक्के, रतलाममध्ये ८०.०२ टक्के आणि उज्जैन जिल्ह्यात ७३.३७ टक्के मतदान झाले.
छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६७.३४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये ६५.०५ टक्के तर भरतपूर सोनहात येथे ६७.९४ टक्के मतदान झाले. त्याचबरोबर बिलासपूर येथे ५६.२८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आलीय. कुरुड मतदारसंघात सर्वाधिक ८२.६० टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.