Assembly Election: पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा ठरल्या? निवडणूक आयोगाचं संभाव्य वेळापत्रक तयार

5 State Assembly Election: निवडणूक आयोगाकडून ५ राज्यांच्या निवडणुकांची संभाव्य वेळापत्रक म्हणजेच ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्यात आलीये.
Assembly Election
Assembly ElectionSaam Tv
Published On: 

प्रमोद जगताप

Political News:

येत्या काही दिवसांत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसलीये. राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाने देखील आपलं काम पूर्ण केलं आहे. निवडणूक आयोगाकडून ५ राज्यांच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक म्हणजेच ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्यात आलीये. (Latest Marathi News)

Assembly Election
Election Commission Meeting : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट, रणधुमाळीचा प्लान काय?

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाचही राज्यांत वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान पार पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये २ टप्पे आणि राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरामसह तेलंगणामध्ये प्रत्येकी एका टप्प्यात मतदानाची शक्यता वर्तवण्यात येतेय.

निवडणूक आयोगाने ५ राज्यांना भेटी दिलीये. पाचही राज्यांतील निवडणुकांच्या वेळापत्रकाची संभाव्य ब्ल्यू प्रिंट तयार केलीये. पाच राज्यांमध्ये १ ते २ टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन तर मध्य प्रदेशात एका टप्प्यात मतदान होऊ शकतं.

मतमोजणी कधी?

१० ते १५ डिसेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांसमोर संभाव्य ब्लू प्रिंट सादर केली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मंजुरी दिली जाईल आणि अंतिम तारखांची घोषणा होईल. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Assembly Election
Nanded Market Committee Election: नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.