Election Commission Meeting : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट, रणधुमाळीचा प्लान काय?

Assembly Election dates : पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट आली आहे.
Election Commission Meeting, assembly election dates
Election Commission Meeting, assembly election datesSAAM TV
Published On

Assembly Election dates :

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 'रणधुमाळी'चा संभाव्य प्लान तयार केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. छत्तीसगडमध्ये दोन आणि राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणात एका टप्प्यात मतदान घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाने हा संभाव्य प्लान पाच राज्यांतील दौऱ्यानंतर तयार केल्याचे बोलले जाते. नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या पाच राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

या सर्व राज्यांत १५ डिसेंबरच्या आधीच मतमोजणी होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते.

निवडणूक निरीक्षकांच्या बैठकीनंतर आज यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु, मतमोजणी एकाच दिवशी होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणूक रण तापलं...

निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याआधीच या राज्यांतील राजकारण तापलं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपसह इतर महत्वाच्या राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. भुपेश बघेल हे मुख्यमंत्री आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. अशोक गेहलोत हे राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर तेलंगणात चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत.

Election Commission Meeting, assembly election dates
MNS News: 'नातवाला राजकारणात ओढाल तर कानाजवळ डीजे वाजवू...' मनसेचा सुषमा अंधारेंना इशारा; प्रकरण काय?

कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा, मध्य प्रदेशात २३०, राजस्थानमध्ये २००, तेलंगणात ११९ आणि मिझोराममध्ये ४० जागा आहेत. या सर्व राज्यांमध्ये २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.

Election Commission Meeting, assembly election dates
Bacchu Kadu: राज्यात दोन मुख्यमंत्री आणि ५ उपमुख्यमंत्री असावेत; बच्चू कडूंचा मिश्किल टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com