Bacchu Kadu: राज्यात दोन मुख्यमंत्री आणि ५ उपमुख्यमंत्री असावेत; बच्चू कडूंचा मिश्किल टोला

Bacchu Kadu News: राज्यात दोन नव्हे तर पाच उपमुख्यमंत्री असावेत, देवाला हे त्याचा आनंद होईल, असा मिश्किल टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला लगावला आहे.
Buldhana News Bacchu Kadu criticizes BJP on the political situation in Maharashtra
Buldhana News Bacchu Kadu criticizes BJP on the political situation in MaharashtraSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Bacchu Kadu on Shinde-Fadnavis Government

पंढरपूर विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, दोन भाऊ मुख्यमंत्री असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात दोन नव्हे तर पाच उपमुख्यमंत्री असावेत, देवाला हे त्याचा आनंद होईल, असा मिश्किल टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला लगावला आहे. (Latest Marathi News)

Buldhana News Bacchu Kadu criticizes BJP on the political situation in Maharashtra
Goregaon Building Fire: गोरेगाव इमारतीतील मृत्यू आगीमुळे नाहीत, तर... महापालिका आयुक्तांची धक्कादायक माहिती

हिंदू धर्मात पाच अंकाला चांगले महत्त्व आहे. सोबतच दोन मुख्यमंत्री देखील असावेत, एक सार्वजनिक कामासाठी आणि एक व्यक्तिगत कामासाठी, अशी मिश्किल टिप्पणी देखील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली. ते बुलढाण्यात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कारण, बच्चू कडू हे भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत. अगदी काल-परवाच बच्चू कडू यांनी भाजपने (BJP) आपल्यासोबत राहणाऱ्यांविरोधात फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा घणाघात भाजपवर केला होता. इतकंच नाही, तर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

राष्ट्रवादी पक्ष कुणाला मिळणार? बच्चू कडू म्हणाले...

राष्ट्रवादी नाव आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार यासंदर्भात देखील बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. एखादा पक्ष फुटला काय आणि राहिला काय याचा देशावर आणि सर्वसामान्यांवर काहीही परिणाम होणार नाही पक्ष कोणाचाही आणि झेंडा कोणाचाही असता तरी काही फरक पडत नाही. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, तो सार्वजनिक विषय नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

अजित पवार राष्ट्रवादी सरकार मोठा पक्ष सोडून आले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिलं असेल. परंतु पुढचा काळ कधी येईल हे सांगता येत नाही. युती टिकणार की नाही? आधी निवडणुका कुठल्या होतील? असे विविध प्रश्न आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या डोक्यात काय विषय सुरू आहेत, हे समजणं फार कठीण आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Edited by - Satish Daud

Buldhana News Bacchu Kadu criticizes BJP on the political situation in Maharashtra
NCP Crisis: शरद पवार की अजितदादा, खरी राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून सुनावणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com