Nanded Market Committee Election: नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजय

Nanded Political News: नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.
maha vikas aghadi and bjp
maha vikas aghadi and bjp saam tv
Published On: 

संजय सूर्यवंशी

Nanded News: नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत मुखेड बाजार समिती वगळता भाजप-महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

मुखेड बाजार समितीमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवलं आहे. उमरी बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत.

maha vikas aghadi and bjp
Balasaheb Thorat News: राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात यांची मागणी

बीलोलीत 18 पैकी 17 जागा महावी आणि एक जागा भाजपला मिळाली आहे. कोंडलवाडी येथे देखील 18 पैकी 17 जागा महावी आणि एक जागा भाजपनं जिंकली आहे. माहुरमध्ये 18 पैकी 14 जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उठाबा गटाच्या आघाडीने जिंकल्या आहेत. तर 4 जागा भाजप, काँगेस युतीने जिंकल्या.

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. चिखलीकर यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या 18 पैकी 16 जागा मिळाल्या .

maha vikas aghadi and bjp
Supriya Sule News: 'दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राचा खेळखंडोबा केला...' सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

निकाल

- उमरी - 18 पैकी 18 जागा महावि

- बिलोली - 18 पैकी 17 जागा महावि , 1 भाजप

- कोंडलवाडी 18 पैकी 17 जागा महावि , 1 जागा. भाजप

माहुर - 18 पैकी 14 जागा राष्ट्रवादी उबाठा आघाडी , 4 जागा भाजप - काँगेस युती

लोहा - 18 पैकी 16 महावि , 02 जगा भाजप

मुखेड - 18 पैकी 12 जागा भाजप, मतमोजणी सुरू

maha vikas aghadi and bjp
Satara Accident:भरधाव वेगात जाणाऱ्या बसचा अपघात; दुचाकीला चिरडत झाडाला धडक, दुचाकीस्वार ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.