

निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. यावरुन आता दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याचवरुन हल्लाबोल करत राष्ट्रवादी फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीमधील अदृश्य शक्तीने महाराष्ट्र राज्याचा खेळ खंडोबा करून ठेवलाय... अशी टीका खा.सुप्रिया सुळेंनी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
"शरद पवार (Sharad Pawar) गटाचे सर्व आमदार अपात्र व्हावेत यासाठी दिल्लीमधील अदृश्य शक्ती ताकद लावत आहे. पण आम्ही सर्व मराठी माणसं या अदृष्य शक्तीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू.." असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच " राज्यातील विविध जिल्ह्याचे पालकमंत्री निवड करत असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागतं" हे सर्व अदृश्य शक्ती करत आहे.. असा टोला सुप्रिया सुळे यांनी अमित शहा (Amit Shah) यांचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधानांवरही निशाणा...
"आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. यावर नरेंद्र मोदी सतत ट्विट करत आहेत. मात्र मणिपूरमध्ये एका महिलेला नग्न करून धिंड काढली जाते, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. मणिपूरमधून काही खोके मिळत नसल्याने ते राज्यात होत असलेल्या दंगलीवर काहीही बोलत नाहीत..." असे म्हणत पंतप्रधानांवरही निशाणा साधला. (latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.