Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

Assam Accident News : आसाममधील डूमडूमा बायपासवर दुचाकी, चहाची पाने वाहून नेणारे वाहन आणि थार यांच्यात भीषण धडक झाली. अपघातानंतर लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.
Assam Accident News
Assam Accident News AI Image
Published On: 
Summary
  • आसाममधील डूमडूमा बायपासवर तीन वाहनांची भीषण धडक

  • धडकेनंतर वाहनांना आग लागली

  • चार जणांचा होरपळून मृत्यू

  • या दुर्घटनेत अन्य दोन जण गंभीर जखमी

आसाममधील डूमडूमा परिसरातील बायपास मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दुचाकी,चहाच्या पानांची वाहतूक करणारे वाहन आणि थार या तीन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातानंतर वाहनांना आग लागल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डूमडूमा बायपासवरून जात असताना तीन वाहनांमध्ये जोरात टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर अचानक आग लागली आणि थोड्याच वेळात आगीने दुचाकी आणि सामान वाहून नेणाऱ्या वाहनाला वेढा घातला. काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली आणि वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर पडणे कठीण झाले.

Assam Accident News
Colon Cancer : पाइल्स समजून दुर्लक्ष करू नका! 'ही' ६ लक्षणे कॅन्सरची असू शकतात; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

या दुर्घटनेत ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भडकली होती की, संबंधितांना वाचवण्याचे प्रयत्न अत्यंत कठीण होते. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. जळालेल्या वाहनांची तपासणी करून त्यामध्ये आणखी कोणी अडकले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Assam Accident News
Women Health : महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय हाडे पोकळ करणारा 'हा' गुप्त आजार, कोणतीही लक्षणे न दिसताच वाढतो धोका

यंत्रणांकडून काळजीपूर्वक तपासणी सुरू आहे. मात्र, वाहनांमध्ये आणखी कोणी अडकले आहे किंवा बेपत्ता आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान, तीन वाहनांची धडक नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत व्यक्तींची नावे तसेच जखमींची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघातासंदर्भातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com