Alisha Khedekar
शौच करताना रक्त दिसणे हे पाइल्सचे लक्षण असू शकते; मात्र कोलन कॅन्सरचाही हा एक संभाव्य संकेत आहे.
वारंवार जुलाब होणे, बद्धकोष्ठता जाणवणे किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटात कळा येणे, दुखणे किंवा वारंवार अस्वस्थता जाणवणे यामागे कोलनसंबंधित समस्या असू शकतात.
आहार किंवा व्यायामात बदल न करता वजन कमी होत असल्यास त्यामागील कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
शौच झाल्यानंतरही पुन्हा शौचाला जावेसे वाटणे किंवा पोट साफ न होणे हे तपासण्याजोगे लक्षण आहे.
ही लक्षणे सतत जाणवत असतील किंवा वाढत असतील तर केवळ पाइल्स समजून उपचार करू नका; तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा