Alisha Khedekar
रात्री अंतर्वस्त्रे न घालता झोपल्यामुळे शरीराला मोकळेपणा मिळतो आणि अधिक आरामदायी झोप लागते.
घट्ट अंतर्वस्त्रांमुळे होणारे घर्षण कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना याचा फायदा जाणवू शकतो.
हवेशीर कपडे किंवा अंतर्वस्त्रांशिवाय झोपल्याने ओलावा कमी साचू शकतो. मात्र, याचा परिणाम खोलीचे तापमान आणि कपड्यांवरही अवलंबून असतो.
हवेशीर वातावरणामुळे प्रायव्हेट पार्टच्या आसपासचा ओलावा कमी राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अधिक महत्त्वाचे आहे.
घट्ट अंतर्वस्त्रांमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊ शकते.तसेच त्वचेचे आजार कमी होण्याची शक्यता.
घर्षणामुळे होणारी काही अस्वस्थता कमी होऊ शकते. मात्र, सतत खाज, जळजळ किंवा दुर्गंधी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा